Sunday, September 8, 2024
Homeक्रीडाAnshuman Gaekwad : अंशुमन गायकवाड यांच्या मदतीला BCCI धावली!

Anshuman Gaekwad : अंशुमन गायकवाड यांच्या मदतीला BCCI धावली!

मुंबई | Mumbai

ब्लड कॅन्सरशी झुंज देत असलेले माजी खेळाडू अंशुमन गायकवाड यांच्या मदतीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुढे आले आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी गायकवाड यांच्या उपचारासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

जय शाह यांनी कॅन्सरशी झुंज देत असलेले भारताचे दिग्गज क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी तातडीने १ कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले. माजी खेळाडू कपिल देव यांनी गायकवाड यांना आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती.

हे देखील वाचा : शेवटच्या सामन्यात झिंबाब्वे टीम इंडिया विरुद्ध कमबॅक करणार?

अंशुमन गायकवाड सध्या ब्लड कॅन्सरशी लढा देत आहेत. गायकवाड लंडनमध्ये होते. पण आता ते बडोद्यात परतले आहेत. जय शहा यांनी अंशुमन गायकवाड यांच्या कुटुंबाशी चर्चा करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. बीसीसीआयने आश्वासन दिले आहे की, अंशुमन गायकवाड यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवतील.

या कठीण प्रसंगी क्रिकेट बोर्डाने माजी खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांना पाठिंबा दर्शविला आहे. अंशुमन गायकवाड यांना आर्थिक मदत करण्यासाठी अनेक मातब्बर मंडळी पुढे सरसावली आहेत. यामध्ये कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, सुनील गावस्कर, संदिप पाटील, रवी शास्त्री या मातब्बर मंडळींनी मदतीचा हात पुढे केला आहे.

हे देखील वाचा : IND VS PAK : आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान विजेतेपदासाठी भिडणार

अंशुमन गायकवाड यांची कारकीर्द

१९७४-१९८५ दरम्यान ४० कसोटी क्रिकेट सामन्यात ७० डावात ३०.०७ इतक्या सरासरीने १९८५ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यात १४ डावात २०.६९ सरासरीने २६९ धावा केल्या यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे.

सलिल परांजपे नाशिक.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या