Friday, November 15, 2024
Homeक्रीडाजय शाह ICC चे नवे अध्यक्ष होणार?

जय शाह ICC चे नवे अध्यक्ष होणार?

दिल्ली । Delhi

आयसीसीचे पुढील अध्यक्ष म्हणून जय शाह (Jay Shah) यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले (Greg Barclay) यांचा कार्यकाळ संपत आहे.

- Advertisement -

काल ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी नकार दर्शवला आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आयसीसीचे पुढील अध्यक्ष म्हणून जय शाह यांच्याकडे लागल्या आहेत.

आयसीसीच्या या पदासाठी जय शाह अर्ज भरणार की नाही हे २७ ऑगस्टपर्यंत स्पष्ट होईल, ही अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. आयसीसी अध्यक्ष प्रत्येकी दोन वर्षांच्या तीन कार्यकाळासाठी पात्र असतात आणि न्यूझीलंडचे वकील बार्कले यांनी आतापर्यंत त्यांच्या कार्यकाळाची चार वर्षे पूर्ण केली आहेत.

हे हि वाचा : तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर…; राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना धरले धारेवर

आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी बोर्डाला कळवले आहे की ते तिसऱ्या टर्मसाठी उभे राहणार नाहीत आणि नोव्हेंबरच्या अखेरीस त्यांचा सध्याचा कार्यकाळ संपल्यावर ते पद सोडतील, असे आयसीसीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. बार्कले यांची नोव्हेंबर २०२० मध्ये आय़सीसीचे स्वतंत्र अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०२२ मध्ये त्यांची या पदावर पुन्हा निवड झाली.

हे हि वाचा : महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने जय शाह (Jay Shah) यांना किमान ३ वर्षांसाठी आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला आहे. सध्याचे आयसीसीचे (ICC) अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे. काल ग्रेग बार्कले यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळासाठी आयसीसीच्या आगामी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे जय शाह यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या