Tuesday, March 25, 2025
Homeनगरजायकवाडीचा उपयुक्त साठा 8.24 टक्क्यांवर

जायकवाडीचा उपयुक्त साठा 8.24 टक्क्यांवर

गोदावरीचा विसर्ग 8401, दारणा 5422, तर कडवा 400 क्युसेकवर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गोदावरीतून जायकवाडी जलाशयात 6567 क्युसेकने पाण्याची आवक काल सायंकाळी 6 वाजता सुरु होती. या जलाशयाचा उपयुक्तसाठा 8.24 टक्के इतका झाला आहे. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 8401 क्युसेकने विसर्गसुरू आहे. जायकवाडीत काल सायंकाळी उपयुक्तसाठा 6.3 टिएमसी इतका झाला. उपयुक्तसह मृतसाठा 32.3 टिएमसी इतका झाला आहे. या जलाशयात उपयुक्तसाठा 8.24 टक्के इतका झाला आहे. भंडारदराही ओव्हरफ्लो झाला आहे. यातील पाणी निळवंडेत येऊन निळवंडे भरल्यानंतर ते पाणी प्रवरा नदीतून जायकवाडी जलाशयाकडे धावू लागेल. या धरणात उपयुक्तसाठा 65 टक्के होणे अपेक्षित आहे. त्यावेळी नगर, नाशिकला पाणी सोडण्याचे टेंशन राहाणार नाही.

- Advertisement -

जोरदार पाऊस लागून राहिल्यास साठा होऊ शकतो. परवा दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी, घोटी परिसरात पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे दारणा धरणात 464 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे या धरणातील विसर्ग वाढवत तो काल सकाळी 6714 क्युसेकवर नेण्यात आला होता. तो दिवसभर टिकून होता. मात्र आवक कमी झाल्याने दारणाचा विसर्ग काल संध्याकाळी कमी करून 5422 क्युसेकवर आणण्यात आला. दारणाचा साठा 85.30 टक्के इतका आहे. 7149 दलघफू क्षमतेच्या या धरणात 6098 दलघफू पाणी साठा आहे. या धरणातून काल सकाळी 6 पर्यंत 2.6 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. काल सकाळी 6 पर्यंत दारणा येथे 26 मिमी, घोटी येथे 56 मिमी तर इगतपुरी येथे 80 मिमी पावसाची नोंद झाली.

दारणाच्या दिशेने भाममधून 1790 क्युसेक, भावलीतून 290 क्युसेक विसर्ग येत आहे. कडवातूनही 400 क्युसेकने विसर्ग दारणाच्या खाली दारणा नदीत दाखल होत आहे. दारणा व मुकणेचा विसर्ग गोदावरीच्या दिशेने नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत आहे. अन्य धरणांचे साठे असे- मुकणे 35.74 टक्के, वाकी 46.91 टक्के, भाम व भावली 100 टक्के, कडवा 85.43 टक्के. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत काल 8401 क्युसेकने विसर्ग सुरू होता. काल सकाळी 6 वाजता हा विसर्ग 5173 क्युसेक होता, तो नंतर 8 वाजता 1614 क्युसेक ने वाढवून 6787 क्युसेक इतका करण्यात आला. तो पुन्हा दोन तांसानी सकाळी 10 वाजता 1614 क्युसेकने वाढवून 8401 क्युसेकवर स्थिर ठेवण्यात आला.

काल सकाळी 6 वाजता 1 जूनपासून या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने 3.3 टिएमसी पाण्याचा विसर्ग गोदावरीत झाला आहे. गंगापूरच्या पाणलोटात मध्यम स्वरुपाच्या पावसाचे आगमन होत आहे. गंगापूर काल सकाळी 62.63 टक्के इतके भरले होते. या धरणाच्या पाणलोटात गंगापूरला 29 मिमी, अंबोलीला 31 मिमी, त्र्यंबकला 22 मिमी पावसाची नोंद झाली. काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत या धरणात 111 दलघफू नविन पाणी दाखल झाले. गंगापूर समुहातील कश्यपी 32.02 टक्क्यांवर, गौतमी गोदावरी 60.12 टक्क्यांवर, आळंदी 30.15 टक्क्यांवर आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...