राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
जायकवाडी जलाशयात काल मंगळवारी सायंकाळी 6 वाजता जिवंतसाठा 90.40 टक्क्यांवर पोहचला होता. या धरणातुन विसर्ग सायंकाळ पर्यंत सोडण्यात आला नव्हता. मात्र कधीही या धरणातुन विसर्ग केला जावु शकतो. जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी धरणांची पाहाणी करुन सतर्कतेचे आदेश आणि पैठण परिसरात पाणी सोडण्या बाबत संदर्भातील सतर्कता बाळगावी म्हणुन दवंडी दिली. काल सायंकाळी 6 वाजता या जलाशयात 17521 क्युसेकने विसर्ग दाखल होत होता. उपयुक्तसाठा 69.30 टिएमसी तर मृतसह एकूण साठा 95.56 टिएमसी पयर्ंत पोहचला आहे. उपयुक्तसाठा 90.40 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे या धरणातुन विसर्ग सोडला जावु शकतो.
जायकवाडी महिनाभरात 13 टक्क्यांवरुन 90 टक्क्यांवर पोहचले. काल सायंकाळी धरणात साडेसतरा हजार क्युसेक ने आवक सुरु होती. काल 90.40 टक्के भरले असले तरी 95 टक्क्यांच्या पुढेहीे या धरणातुन पाणी सोडले जावु शकते. किंवा रात्रीतुनही विसर्ग सोडला जावु शकतो. माजलगाव साठी 500 क्युसेकने विसर्ग सोडला जात आहे. दरम्यान गोदावरी नदीत नांदूरमधमेश्व बंधार्यातुन 3962 क्युसेक ने विसर्ग सुरु आहे. या बंधार्यात दारणातुन 1300 क्युसेक, गंगापूर मधुन 1105 क्युसेक, वालेदवी 183 क्युसेक, पालखेड मधुन 1446 क्युसेक, करंजवण मधुन 903 क्युसेक, तीसगाव 284 क्युसेक तर ओझरखेड मधुन 68 क्युसेक असे विसर्ग दाखल होत आहेत. काल सकाळ पर्यंत गोदावरीत या बंधार्यातुन 40.3 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.