Friday, November 22, 2024
Homeनगरजायकवाडीत उपयुक्तसाठा 25 टक्क्यांवर

जायकवाडीत उपयुक्तसाठा 25 टक्क्यांवर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

जायकवाडीत काल सायंकाळी 19 हजार क्युसेकने आवक सुरु होती. काल जायकवाडीत उपयुक्तसाठा रात्री उशीरा 25 टक्के इतका झाला होता. नगर, नाशिकच्या धरणांच्या पाणलोटात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे विसर्ग घटले आहेत. गोदावरी व प्रवरा नदीतून जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 19 हजार क्युसेकने आवक सुरु होती. काल उपयुक्तसाठा या धरणात 18.95 टीएमसी इतका झाला होता. तर मृतसह एकूण साठा 45.02टीएमसी इतका झाला होता.

- Advertisement -

काल गोदावरीतील विसर्ग सायंकाळी 6 वाजता 4696 क्युसेकवर आला होता. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दारणातून 2001 क्युसेक, वालदेवीतून 107 क्युसेक, गंगापूर मधून 2018 क्युसेक, भोजापूर मधून 539 क्युसेकने आवक सुरु होती. कडवा व पालखेड धरणांचे विसर्ग बंद करण्यात आले आहेत. काल सकाळी 6 वाजता एक जुनपासून नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने 14.8 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. नाशिक जिल्ह्यातील धरणांचे उपयुक्त साठे 75.44 टक्के इतके झाले आहेत.

गतवर्षी कालच्या तारखेला ते 73.36 टक्के इतके होते. काल सकाळी 6 वाजता धरणांचे साठे असे- दारणा 87.16 टक्के, मुकणे 55.30 टक्के, वाकी 74.24 टक्के, भाम 100 टक्के, भावली 100 टक्के, वालदेवी 100 टक्के, गंगापूर 87.80 टक्के, कश्यपी 56.05 टक्के, गौतमी गोदावरी 91.76 टक्के, कडवा 80.98 टक्के, आळंदी 85.78 टक्के, भोजापूर 100 टक्के, पालखेड 67.08 टक्के असे साठे आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या