राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता संपलेल्या 12 तासात 9808 क्युसेकने नविन पाण्याची आवक सुरू होती. या जलाशयात 28.03 टक्के उपयुक्तसाठा तयार झाला आहे. जायकवाडी जलाशयात गोदावरी तसेच प्रवरातून विसर्ग दाखल होत आहे. काल सायंकाळी 9808 क्युसेकने पाण्याची आवक होत होती. काल या जलाशयात सायंकाळी 6 वाजता उपयुक्तसाठा 21.49 टिएमसी इतका झाला होता. तर मृतसह एकूण साठा 47.57 टक्के इतका झाला. काल या धरणात 28.03 टक्के उपयुक्त पाणीसाठा तयार झाला होता.
दारणा धरणाच्या पाणलोटात अधूनमधून मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. दारणातून 4539 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. काल सकाळी 6 पर्यंत दारणातून 9 टिएमसीचा एकूण विसर्ग नांदूरमधमेश्वर बंधार्याच्या दिशेने 1 जून पासून झाला आहे. तर खाली नांदूरमधमेश्वर बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 16.6 टिएमसी पाण्याचा विसर्ग झाला. काल गोदावरीत या बंधार्यातून 5576 क्युसेकने विसर्ग सुरू होता. काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 13 मिमी, पाणलोटातील इगतपुरी येथे 68 मिमी, घोटी येथे 33 मिमी पावसाची नोंद झाली.
भावलीतून 208 क्युसेकने, भाम मधून 1120 क्युसेकने, वालदेवीतून 107 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. दारणात काल सकाळी 6 वाजता मागील 24 तासांत 252 दलघफू नविन पाणी दाखल झाले. नविन येणार्या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दारणात 87.37 टक्के पाणीसाठा आहे. मुकणे धरण 57.67 टक्के भरले आहे. वाकी 78.73 टक्के, भाम व भावली, वालदेवी 100 टक्के भरले आहेत. गंगापूर धरणात काल सकाळी 6 वाजता 85.86 टक्के पाणीसाठा होता.गंगापूर मधून 951 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कालपर्यंत गंगापूर मधून 1.1 टिएमसी पाण्याचा विसर्ग नांदूरमधमेश्वर बंधार्याच्या दिशेने झाला आहे. कश्यपी 59.56 टक्के, गौतमी गोदावरी 90.85 टक्के, कडवा 82.11 टक्के, आळंदी 95.47 टक्के, भोजापूर 100 टक्के असे पाणी साठे आहेत. गंगापूर समुहात नगण्य पाऊस होता.
खाली नांदूरमधमेश्वर बंधार्यात वरील धरणांचा विसर्ग येत असल्याने काल सकाळी या धरणातुन 5567 क्युसेकने विसर्ग गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात येत होता. काल सकाळी 6 पर्यंत 1 जून पासुन या बंधार्यात एकूण 1 लाख 92 हजार 840 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने करण्यात आला आहे. म्हणजेच 16.6 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.