Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याJayant Patil : "ती गुप्त नव्हे तर..."; शरद पवार-अजित पवारांच्या भेटीबाबत जयंत...

Jayant Patil : “ती गुप्त नव्हे तर…”; शरद पवार-अजित पवारांच्या भेटीबाबत जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

मुंबई | Mumbai

काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पुण्यातील (Pune) कोरेगाव पार्कमध्ये (Koregaon Park) अतुल  चोरडिया या बड्या उद्योगपतींच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती…

- Advertisement -

उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यावर शरद पवार उपस्थित असताना अजित पवारही या बंगल्यावर जातानाचे दृष्य अनेक वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरामध्ये कैद झाले होते. या भेटीवेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते अशी माहिती समोर आली होती. अशातच आता या भेटीवर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis : “या भेटीबाबत मला…”; शरद पवार-अजित पवारांच्या गुप्त भेटीवर फडणवीस स्पष्टच बोलले

यावेळी बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, “कोण-कोणाला भेटले यावर कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम असण्याची गरज नाही. लोकं एकमेकांना भेटत असतात. त्यामुळे याबद्दल विशेष सांगण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. ती गुप्तबैठक नव्हती. मी पवारसाहेबांसोबत गेलो आणि मी तिथून निघून आलो. त्यामुळे या भेटीत काय चर्चा झाली हे मला माहिती नाही, असे पाटील यांनी म्हटले.

Nashik News : संभाजी स्टेडियमचे काम पूर्ण होण्यासाठी नगरसेविकेने दिला बोकड बळी

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “माझ्याबद्दल बातम्या पेरल्या जातात असे मला वाटतं. आता हे कोण करतंय ते तुम्हीच हुडकून काढा. माझी भूमिका मी याआधीच स्पष्ट केल आहे. ईडी आणि गुप्तभेटीचा काही संबंध नाही. निकटवर्तीयांना म्हणजे माझ्या बंधूना ईडीची नोटीस आली आहे. एका कंपनीसंदर्भात त्यांना माहिती विचारण्यात आली आणि ते चार दिवसांपूर्वीच जाऊन आले. त्याचा आणि भेटीचा काही संबंध नाही, असे पाटील यांनी सांगितले.

Rain Update : राज्यात मुसळधार पाऊस कधी बरसणार? हवामान विभागाने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

तसेच जयंत पाटील यांना माध्यम प्रतिनिधींना ‘तुम्ही लवकरच मंत्रिमंडळात दिसणार अशा चर्चा सुरू आहेत’, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना पाटील म्हणाले की, अशा चर्चा नेहमीच सुरू असतात. कोणताही आमदार (MLA) कधीही मंत्री (Minister) होऊ शकतो, अशा आशयाने अशा बातम्या येत असतात, त्याकडे फार लक्ष देऊ नका असे जयंत पाटील यांनी म्हटले.

तर राष्ट्रवादीत फूट पडली आहे का? असे विचारले असता पाटील म्हणाले की, सगळेच शरद पवार यांचा फोटो लावतात. सगळेच आम्ही शरद पवारांसाठी काम करत आहोत असे सांगतात. त्यामुळे अजून तरी फूट नजरेत नाही, असं शरद पवारांनी निवडणूक आयोगाला कळवले असल्याचे पाटील यांनी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या