Saturday, July 27, 2024
HomeनगरSaReGaMaPa Little Champs च्या मंचावर झळकणार करजगाव विद्यालयाचा 'जयेश खरे'

SaReGaMaPa Little Champs च्या मंचावर झळकणार करजगाव विद्यालयाचा ‘जयेश खरे’

करजगाव | वार्ताहर

आपल्या जादुई आवाजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेला बालगायक जयेश खरे उद्यापासुन (बुधवार) सारेगामापा “लिटल चॅम्प्स” च्या मंचावर झळकणार आहे. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी म्हटले होते कि या मातीमध्ये अनेक प्रकारची रत्ने तुम्हाला सापडतील. फक्त ती माती ढवळण्याची गरज आहे. असेच हे जयेश नावाच रत्न ग्रामीण भागात सापडले.

- Advertisement -

संगितकार अजय-अतुल यांनी जयेशचा आवाज हेरत त्याला “महाराष्ट्र शाहिर” या चित्रपटात गाण्याची संधी दिला. बुधवार दि 9 पासुन सष्टेबर पासुन सुरू होणाऱ्या झी टीव्ही मराठीच्या सारेगामापा ‘लिटल चॅम्प्स’च्या बुधवार व शनिवार च्या कार्यक्रमात गाताना दिसणार आहे. यामध्ये त्याला जेष्ठ गायक महागुरू सुरेश वाडकर, सलील कुलकर्णी, गायिका वैशाली माढे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. गायक सलील कुलकर्णी हे जयेशला नेण्यासाठी वांजुळपोई (ता राहुरी) येथे आले होते. जयेश हा रयत शिक्षण संस्थेच्या श्री छ्त्रपती शिवाजी विद्यालय करजगाव (ता. नेवासा) मध्ये इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत आहे. याबद्दल जयेशला करजगाव विद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच वांजुळपोई ग्रामस्थांनी त्या शुभेच्छा दिल्या आहे.

16 सष्टेबर 2022 ला जयेशने वर्गात गायलेला चंद्रमुखी या चित्रपटातील कोणत्याही वाद्याच्या साथसंगती शिवाय चंद्रा हे गाणं गायलं होतं. या गायलेल गाण्याचा व्हिडिओ शिक्षक कृष्णा राठोड यांनी काढुन सोशल मिडीयावर टाकला. हा व्हिडिओ नेटकऱ्यांवर अनेक संगितकार गायकांनी जयेशच कौतुक केले होते. जयेश चे वडिल विश्वास खरे हे हे त्याचे पहिले गुरू. वांजुळपोई येथिल जिल्हा परिषद शाळेत असतांना त्याला शिक्षिका कल्हापुरे मॅडम यांनी त्याला प्रोत्साहन दिले होते. त्यानंतर तो आपल्या वडिलाबरोबर खाजगी ऑक्रेस्टामध्ये गायनाचे काम केले. घरातुन त्याला खरे मार्गदर्शन सुरू झाले. करजगांव विद्यालयातील कला शिक्षक सुभाष चारूडे, शनीशिंगणापुर येथिल सोनु साठे, चंदन कांबळे आदीचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. जयेश खरे सध्या वळण (ता राहुरी) येथिल डॉ वसंतराव गोसावी संगित विद्यालयात आर्यन भनगडे व सुनिल महाराज पारे यांच्या मार्गदर्शनाखाली गायनाचे धडे घेत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या