Friday, May 24, 2024
Homeनगरजेऊरकुंभारीत अवैध वाळूउपसा जोरात

जेऊरकुंभारीत अवैध वाळूउपसा जोरात

जेऊरकुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari

कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी गोदावरी नदी पात्रामधून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याचा शेतकरी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जेऊरकुंभारी नदीपात्रातील वाळु उपसा बंद व्हावा यासंदर्भात ग्रामपंचायतीने वेळोवेळी कोपरगाव तहसीलदार यांना निवेदन देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

- Advertisement -

पावसाळा सुरू झाला आहे. वाळूउपसा असाच सुरू राहिला तर शेतकर्‍यांना शेती करणे अवघड होईल.नदीच्या कडेला असलेली शेती वाळूच्या उपशामुळे माती ढसळली जात आहे. 20 फूट खोल खड्डे केले आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतीची सार्वजनिक नळपाणी पुरवठा विहीर व इतर शेतकर्‍यांच्या विहिरी बाधित होण्याच्या मार्गावर आहे. हा वाळू उपसा करून त्याची वाहतूक करण्यासाठी गावठाणचा दळणवळणाचा रस्ता खचुन खड्डे पडलेली आहे.

त्यामुळे त्याचा त्रास गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. याबद्दल प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी नाहीतर जेऊरकुंभारी ग्रामस्थांच्यावतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जेऊरकुंभारी ग्रामपंचायतीने दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या