Sunday, April 27, 2025
Homeक्राईमकोपरगाव, संगमनेर, शिर्डी, श्रीरामपुरात महिलांचे दागिने चोरणारी टोळी अटकेत

कोपरगाव, संगमनेर, शिर्डी, श्रीरामपुरात महिलांचे दागिने चोरणारी टोळी अटकेत

एलसीबीची कामगिरी || 17 लाखांचे दागिने हस्तगत, श्रीरामपुरातील तिघांचा समावेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोपरगाव, संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर, शेवगाव तालुक्यात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने (सोनसाखळी) चोरणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. सहा जणांच्या टोळीतील तिघांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 215 ग्रॅम दागिन्यांसह 17 लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, तिघांकडे चौकशी केली असता 14 गुन्ह्यांची उकल झाली आहे.

- Advertisement -

विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ धैल्या चव्हाण (वय 26 रा. मोहटादेवी मंदिरामागे, अशोकनगर, ता. श्रीरामपूर), सुनील शानिल पिंपळे (वय 37), विशाल सुनील पिंपळे (वय 22, दोघे रा. वसु सायगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी जेरबंद केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांनी साथीदार राजेश राजू सौलंकी (रा. सुहागपूर, जि. हौशीगाबाद, मध्यप्रदेश), ऋषीकेश कैलास जाधव, रंगनाथ ऊर्फ रंग्या युवराज काळे (दोघे रा. श्रीरामपूर) यांच्यासोबत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांचा पोलिसांनी शोध घेतला असता मिळून आले नाहीत.

रूपाली सुधीर कदम (वय 32, रा. दत्तनगर, श्रीरामपूर) या बाभळेश्वर रस्त्याने जात असतांना दोन चोरट्यांनी दुचाकीवर वेगात येऊन त्यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण बळजबरीने हिसकावून नेले होते. या गुन्ह्यासह जिल्ह्यातील इतर सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, सचिन अडबल, संतोष लोढे, विजय ठोंबरे, संतोष खैरे, रणजित जाधव, रोहित येमूल, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, प्रशांत राठोड, अमृत आढाव, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तपास करत होते.

पथकाने संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव, शेवगाव या ठिकाणी झालेल्या सोन साखळी चोरीच्या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून गुप्त बातमीदारामार्फत संशयित आरोपींची माहिती घेतली. सदर गुन्हा रेकॉर्डवरील संशयित आरोपी विनोद ऊर्फ खंग्या विजय उर्फ छैल्या चव्हाण याने साथीदारांसह केला असल्याची व तो साथीदारासह चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करीता श्रीरामपूर – नेवासा रोडवरील अशोकनगर फाटा येथे येणार असल्याची माहिती निरीक्षक आहेर यांना मिळाली. पथकाने सापळा रचून दोघांना व नंतर एकाला ताब्यात घेत अटक केली आहे.

14 गुन्हे उघडकीस
अटक केलेल्या तिघांकडे चौकशी केली असता कोपरगाव शहर, संगमनेर शहर, शिर्डी, श्रीरामपूर शहर व शेवगाव येथील 14 गुन्हे उघडकीस आले आहेत. विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ छैल्या चव्हाण विरोधात श्रीरामपूर शहर, तोफखाना, सिडको एमआयडीसी, हरसूल व पुंडलिक नगर, छावणी, सिटी चौक (छत्रपती संभाजीनगर), लोणी, राहुरी, शिर्डी, संगमनेर शहर, कोपरगाव शहर, परतूर (जालना), जवाहरनगर, देवळाली कॅम्प (नाशिक), पनवेल (नवीमुंबई) अशा विविध पोलीस ठाण्यात 43 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापाकडून मुलीची गोळ्या झाडून हत्या

0
चोपडा | प्रतिनिधी | Chopda जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) चोपडा शहरात (Chopda City) मुलीने प्रेमविवाह (Love Marriage) केल्याच्या रागातून सेवानिवृत्त सीआरपीएफ बापाने मुलीसह जावयावर गोळीबार...