Wednesday, June 26, 2024
Homeक्राईमनातेवाईकांचे दागिने चोरले, तारण ठेऊन कर्ज घेतले

नातेवाईकांचे दागिने चोरले, तारण ठेऊन कर्ज घेतले

चोरी करणारा अटकेत || एलसीबीची कामगिरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नातेवाईकांच्या घरातून चोरलेले सोन्याचे दागिने तारण ठेऊन त्यावर कर्ज घेतल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरी करणार्‍याला सरडेवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथून ताब्यात घेत अटक केली. प्रशांत मानसिंग बाचकर (वय 27 रा. सरडेवाडी) असे त्याचे नाव आहे. गणपत पोपट कायगुडे (वय 45 रा. कायगुडे वस्ती, राशिन, ता. कर्जत) हे 12 जून रोजी कुटुंबातील व्यक्तींसह बाहेरगावी गेले असता वृध्द आई – वडिल घरात होते.

त्यावेळी त्यांच्या नात्यातील प्रशांत बाचकर वडिलांना औषध देण्यासाठी घरी आला असता त्याने 35 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याची फिर्याद कायगुडे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बाळासाहेब मुळीक, रवींद्र कर्डिले, रोहित मिसाळ, आकाश काळे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाबासाहेब खेडकर, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर यांचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. तांत्रिक तपासातून संशयित आरोपी प्रशांत बाचकर राहत्याघरी असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला.

दरम्यान, त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरीचे दागिने तारण ठेऊन कर्ज घेतले असल्याचे सांगितले. त्याच्याकडे कर्ज घेतल्याच्या पावत्या मिळून आल्या आहेत. तसेच उर्वरीत एक लाख 20 हजारांचे दागिने मिळून आल्याने ते हस्तगत करण्यात आले आहेत. त्याला पुढील तपासकामी कर्जत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या