ओझे । वार्ताहर Oze
दिंडोरी तालुक्यात ना. नरहरी झिरवाळ यांना जनतेचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता त्यांचा विजय सर्वत्र दिंडोरी – पेठ मतदार संघामध्ये मतदार मान्य करत आहे. म्हणूनच त्यांचे पक्षातील वजन, काम करण्याची पध्दत, राज्याच्या राजकारणातील त्यांचा प्रभाव व आदिवासी जनतेतून उभे राहिलेले साधे सरळ व्यक्तीमत्त्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला झिरवाळांची ओळख निर्माण झाल्यामुळे दिंडोरी – पेठ मतदार संघातील जनतेने त्यांना डोक्यावर घेतले असून त्यांचा विजय निश्चित असल्यामुळे व तालुक्यातील आदिवासी तसेच सर्व जातीधर्माचा वाढता पाठिंबा मिळत असल्यामुळे तरुणांमध्ये ना. नरहरी झिरवाळांची क्रेझ निर्माण होवून ना. झिरवाळांकडे तालुक्यातील तरुण मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असतांना दिसत आहे.
प्रत्येक गावात गेल्यानंतर तरुणांकडून झिरवाळांबरोबर फोटोशेषन केले जाते. तसेच शासनाची ‘लाडकी बहिण’ योजना संपूर्ण खेडोपाडी गेल्यामुळे व या योजनेतून मिळालेल्या पैश्यामुळे आदिवासी तसेच सर्वच कुटूंबाची दिवाळी सुखात साजरी झाल्यामुळे प्रत्येक गावांमध्ये या लाडक्या बहिणींकडून ना. झिरवाळांचे औक्षण केले जात आहे. ओझे गावात तर चक्क तरुणांनी कहर केला. गावात ना. झिरवाळ साहेबांचे आगमण होताच फटाक्याची आतषबाजी करण्यात आली व झिरवाळ साहेब तुम्हाला प्रचार करण्याची गरज नाही. तुम्ही आताच निवडून आले आहे. त्यामुळे तुम्ही आताच महाराष्ट्राचे आदिवासी विकासमंत्री झालेले आहेत. असे आम्हाला वाटत असल्यामुळे आताच आदिवासी विकास मंत्र्याची नेमप्लेट तुम्हाला भेट देत आहोत, असे तरुणांनी सांगितले व
ना. झिरवाळांना चक्क ना. नरहरी झिरवाळ आदिवासी विकासमंत्री महाराष्ट्र शासन असे नाव असलेली नेमप्लेट भेट दिली. त्यामुळे झिरवाळ यांनी जनतेने आता मला निवडून दिल्यामुळे मनापासून धन्यवाद दिले. झिरवाळांची अशी क्रेझ पाहता दिंडोरी – पेठ मतदार संघात नरहरी झिरवाळ हे मंत्री होतील, त्यामुळे आपले मतदान वाया जावू नये, यासाठी घड्याळालाच मतदान करायचे असे निर्णय गावोगावी होत आहे.