Saturday, November 16, 2024
Homeजळगावसंस्कारक्षम पाल्य घडविणार्‍या मातांचा ‘जिजामाता’ पुरस्काराने सन्मान

संस्कारक्षम पाल्य घडविणार्‍या मातांचा ‘जिजामाता’ पुरस्काराने सन्मान

जळगाव । प्रतिनिधी

भारतीय संस्कृती ही वैभवशाली, संस्कारक्षम आहे. संस्कारांचा हा वारसा आदर्श मातांकडून पुढे चालला आहे. अशाच संस्कारक्षम पाल्य घडविणार्‍या मातांचा बी.यू.एन.रायसोनी इंग्लीश मिडीयम स्कुल पिंप्राळा या शाळेतर्फे स्नेहसंमेलन (गोल्डन मेमोरीज) व नाताळसणाचे औचित्य साधून आदर्श मातांचा ‘जिजामाता’ पुरस्कार (ट्रॉफी) देवून मान्यवरांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

छत्रपती संभाजीराजे नाट्य संकुल महाबळ रोड जळगाव येथे झालेल्या स्नेहसंमेलनाच्य अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मिलींद कुलकर्णी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षणाधिकारी सतीश चौधरी, शनिपेठ पो.स्टे.चे पी.आय.विठ्ठल ससे उपस्थित होते.

गुणवंतांचा गौरव

मान्यवरांच्या हस्ते विविध परिक्षांमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे वेळेचे आणि शिस्तीचे पालन करणाऱ्या शिक्षीका दामीनी पाटील, निता चव्हाण, शिवानी पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.

स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी विविध गाण्यांवर अफलातून नृत्यअविष्कार सादर केले. त्यांनी सादर केलेल्या नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. विशेष म्हणजे गायन, नृत्यात उत्कृष्ट कलाकारी करून गिनीजमुकात नोंद झालेल्या व ‘अंगार’चित्रपटात काम केलेल्या कावेरी सुरवाडकरचे नृत्य सर्वांचे आकर्षण ठरले. संस्थेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

कुटूंबातील संस्कार महत्वाचे

शाळेतील शिक्षणा सोबतच कुटूंबातील संस्कार महत्वाचे असतात, म्हणून पालकांनी कुटूंबात आदर्शआचारण ठेवावे व मुलांवर चांगले संस्कार टाकावेत असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मिलींद कुलकर्णी यांनी केले.

मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवा

मोबाईल गरजेचे रूपांतर व्यसनात कधी होते आपल्यालाच कळत नाही. सध्या तर मोठ्यांपासून लहानांपर्यंत त्याची सवय जडून गेली आहे, त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येत आहेत त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवा असे मत उपशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी व्यक्त केले.

मुलांवर चांगल्या संस्कारांची गरज

देशाचे भवितव्य तरूण पिढीच्या हातात असते असे म्हटले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून बी.यू.एन. रायसोनी शाळेची शैक्षणिक वाटचाल सुरू असल्याचे सांगत संस्थाचालकांना शुभेच्छा दिल्या व पालकांनी मुलांवर चांगले संस्कार रूजवावेत, मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावे असे आवाहन केले.

शाळेच्या यशस्वी वाटचालीची यशोगाथा मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांनी वाचून दाखविली. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सौ.नलीनी शर्मा, विठ्ठल पाटील, चंद्रशेखर पाटील, सौ.रेखा कोळंबे यांचेसह  सर्व शिक्षक वृंद, सुर्यकांत लाहोटी, पालक संघाचे पदाधिकारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या