Thursday, November 7, 2024
Homeब्रेकिंग न्यूजना.झिरवाळ कॅबिनेटमंत्री होतील : तांबडे

ना.झिरवाळ कॅबिनेटमंत्री होतील : तांबडे

महायुतीच्या प्रचाराला वणीत नागरिकांची गर्दी

वणी/दिंडोरी । प्रतिनिधी Vani


महायुतीचे उमेदवार ना. नरहरी झिरवाळ यांनी हजारो लोकांच्या उपस्थितीत वणी शहरात प्रचंड शक्तीप्रदर्शन करत प्रचाराचा नारळ फोडला.‘ वणीत उफाळलेला प्रचंड जनसागर पाहता राज्यात पुन्हा महायुती सरकार येणार असून महायुती सरकारमध्ये ना. नरहरी झिरवाळ हे कॅबिनेट मंत्री होतील, यात शंका नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी केले.

- Advertisement -

वणी येथे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, रिपाइं, आदिवासी संघटना महायुतीचे उमेद्वार विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ नारळ फोडण्याचा कार्यक्रम झाला. दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात जावून स्वामी समर्थांचे दर्शन घेत प.पू. अण्णासाहेब मोरे यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर वणी येथे जगदंबा मंदिरात जगदंबा मातेचे पूजन केले. खंडेराव महाराज, श्री गणेशाचे दर्शन घेतले. खंडेराव महाराज मंदिरातून रॅलीस सुरुवात झाली. यावेळी सर्वांनी ना. नरहरी झिरवाळ यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. खेड्यापाड्यातून उत्स्फूर्तपणे नागरिक सहभागी झाले. ना. नरहरी झिरवाळ यांचे वणी शहरातील दुकानदार दुकानाच्या बाहेर येवून स्वागत करत होते. ना. नरहरी झिरवाळ लहान थोर, वयोवृध्द यांचे आशीर्वाद घेत होते. रॅलीमध्ये प्रचंड जनसमुदाय सहभागी झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सगळीकडे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस, रिपाइं, आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते विखुरलेले होते. चौकचौकात ना. झिरवाळ यांचे स्वागत केले जात होते.

यावेळी ‘ नरहरी झिरवाळ आगे बेढो, हम तुम्हारे साथ है’ आदी घोषणा दिल्या. वणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही ना. नरहरी झिरवाळ यांनी अभिवादन केले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनाही अभिवादन केले.जगदंबा मंदिरात प्रचंड सभा झाली. मंदिराचे ओटे व परिसराच्या बाहेर सुध्दा लोक गर्दी करुन बसले होते. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील होते. यावेळी प्रकाश शिंदे यांनी मनोगतात सांगितले की, ना. नरहरी झिरवाळ हे सर्वसामान्य जनतेच्या सुखदुखात सहभागी होणारा उमेद्वार असून त्यांनी दिंडोरी व पेठ तालुक्याचा कायापालट घडून आणला. त्यामुळे नरंहरी झिरवाळ यांच्याबरोेबर आलो आहोत. नरहरी झिरवाळ हे पुढील मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री झाल्याशिवाय रहाणार नाही.

यावेळी रिपाईचे उपजिल्हाप्रमुख रत्नाकर पगारे यांनी आंबेडकरी जनता घड्याळाला मतदान केल्याशिवाय रहाणार नाही असे सागितले.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रविद्र पगार, पेठचे कामडी, गणपतराव पाटील, विलास कड, मनोज शर्मा, तानाजी पगार, वसतंराव कावळे, सुरेश कळमकर, रविकुमार सोनवणे, रत्नाकर पगारे आदींनी मनोगत व्यक्त केले. दिंडोरी मतदारसंघ हा शांतताप्रिय असुन कुणीही वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करु नये केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असे जाहिर आवाहन वसंत कावळे, प्रकाश शिंंदे यांनी दिले. महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी सांगितले विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे.

आतापर्यत महायुतीसरकारकडुन आपण तालूक्याला कोट्यवधीचा निधी आणला.पाणी योजना आणल्या. आपल्यावर विरोधक चुकिचा आरोप करतात .मात्र आपण कोणत्याही आरोपाला उत्तर देण्यास तयांर आहोत. तालूक्यातील जनता विकासकामांच्या मुदयावर पुन्हा आपणाला विधानसभेत पाठवेल असा विश्वास झिरवाळ यांनी व्यक्त केला.एका लहान मुलाने झिरवाळ यांच्यावर गीत सादर करुन उपस्थितांचे मने जिकंली. सुत्रसंचालन प्रकाश वडजे, राजेंद्र उफाडे यांनी केले. यावेळी सर्व सामान्य जनता, व्यापारी, उपस्थित होेते. वणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला.

झिरवाळांचा प्रथमच आक्रमक पवित्रा
दिंडोरी । ना. नरहरी झिरवाळ यांनी आक्रमक भाषण केले. ते म्हणाले की, विरोधकांनी प्रचार करतांना जातीवादाचा प्रचार करु नये. जातीद्वेशाचे विष पेरु नये, जातीद्वेशाने स्वत: चेच नुकसान विरोधक करतील. विरोधक हे सुध्दा विधानभवनात काही काळ राहिलेले आहेत. त्यांनी आपल्या कामांच्या बाबत गैरसमज पसरऊ नये. विधानभवनात मंजूर झालेले कामे रद्द होत नसतात, याची माहीती विरोधकांना नसावी. माझ्या विधानभवनात काम करण्याचा अनुभवाचा वापर दाडगा झालेला आहे. जो जसा वागेल त्यास तसंच उत्तर दिले जाईल. कुणीही कोणते आरोप करतांना विचार करावा. लईच बोलायचे असेल तर समोरासमोर येवून बोलावे. पेसाबाबतही विरोधकांना काही माहिती नसावी. आपल्या समोर त्यांनी प्रश्न विचारावे नाही तर मी प्रश्न विचारतो. त्यांना उत्तर देता येता की नाही हे जनतेने पाहवे, असे प्रचंड आक्रमक भाषण ना. नरहरी झिरवाळ यांनी केले. ना. नरहरी झिरवाळ यांनी कुणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्याकडे होता. ना. झिरवाळ यांचा आक्रमक पवित्रा प्रथम पहायला मिळाल्याने सर्वजण आवाक झाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या