Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदेंच्या बंडानंतर २४ तासात राष्ट्रवादीकडून पत्र तयार होतं, मात्र...; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक...

शिंदेंच्या बंडानंतर २४ तासात राष्ट्रवादीकडून पत्र तयार होतं, मात्र…; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा

मुंबई | Mumbai

अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदारांसह सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी शपथ घेतली आहे. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. महाराष्ट्रातील सत्तांतरात दररोज नव्या घडामोडी घडत आहेत. आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे….

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, भाजपबरोबर (BJP) जाण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडे होता. शिंदेंनी बंड केल्यानंतर २४ तासात राष्ट्रवादीकडून (NCP) आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र तयार केले होते. अजित पवारांनी सांगितले म्हणून आमदारांनी त्यावर सही केली होती. यामध्ये मी देखील सही केली होती. पण शरद पवार (Sharad Pawar) साहेबांना एकटे कसे सोडायचे म्हणून जयंत पाटलांनी (Jayant Patil) पत्र दिले नाही, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

सुप्रियाताईंच्या उपस्थितीत सत्तेत जायचं ठरलं; राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

दरम्यान, सत्तेत सहभागी होण्यापूर्वी शरद पवार (Sharad Pawar) साहेबांना आम्ही विचारायला जावे, असे आम्हाला वाटत होते. सत्तेत जाण्याचा निर्णय झाला त्या चर्चेवेळी तिथे सुप्रिया ताईदेखील होत्या. तिथे प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ हे सर्व वरिष्ठ नेतेही होते. या सर्वांनीच जर हा निर्णय घेतला असेल तर तो निर्णय योग्यच असेल. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Video : नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने; कार्यालय ताब्यात घेण्यावरून राडा

- Advertisment -

ताज्या बातम्या