Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजJitendra Awhad On Ajit Pawar: …असा प्रयत्न बीडमध्ये जाऊन करू नका; जितेंद्र...

Jitendra Awhad On Ajit Pawar: …असा प्रयत्न बीडमध्ये जाऊन करू नका; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा

मुंबई । Mumbai

मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्याचे राजकारण संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणामुळे चांगलेच तापले आहे. अशातच बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना न देता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना देण्यात आले. यावरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

“अजित पवार यांची बीडच्या पालकमंत्रिपदी मुख्यमंत्र्यांनी निवड केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. हे लिहिण्याचे कारण एवढेच की, “पुण्याचे पालकमंत्री असताना एक मककोचा आरोपी काही जणांच्या आग्रहाखातर आपण प्रयत्नपूर्वक सोडवला होता,” असे वक्तव्य आपणच एका जाहीर सभेत मनमोकळेपणे केले होते. असा प्रयत्न बीडमध्ये जाऊन करू नका, अशीच आपणाला विनम्र विनंती आणि हात जोडून प्रार्थना. कायद्याचे राज्य स्थापित कराल, ही जी शपथ घेतली आहे, त्या शपथेची फक्त आठवण करून देतोय,” अशी खोचक टीका आव्हाड यांनी एक्सवर व्हिडिओ पोस्ट करत केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...