Monday, November 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूज"बिलाला पाठिंबा देणे म्हणजेच थेट देशाशी आणि संविधानाशी प्रतारणा...", नताशा आव्हाडांच्या आक्षेपावर...

“बिलाला पाठिंबा देणे म्हणजेच थेट देशाशी आणि संविधानाशी प्रतारणा…”, नताशा आव्हाडांच्या आक्षेपावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी काल एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये नताशा आव्हाड यांनी “माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते” असे म्हटले होते. डिलिमिटेशनला समर्थन देणे म्हणजे भाजपला राजकीय फायदा मिळवून देण्यासारखे आहे असं नताशा आव्हाड यांनी म्हटलं. नताशा यांच्या भूमिकेवरुन नाराजीचे सूर उमटत असताना जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय म्हंटलं?
नताशा माझी एकुलती एक कन्या आहे. तिच्या स्वातंत्र्यावर आम्ही कुणीही अंकुश ठेवलेला नाही. तिने काय बोलावं हा तिचा प्रश्न आहे. माझ्यावर, माझ्या कुटुंबावर शरद पवारांचे जे उपकार आहेत त्याची परतफेड आम्ही कधी जन्मात करु शकणार नाही, हे मला समजतं कदाचित तिला ते समजत नसेल. त्यामुळे तिला बोलण्याचा अधिकार आहे ती बोलते आहे. शरद पवार साहेब हे लोकशाही मानणारे आहेत. तिला बोलू देऊ नको वगैरे ते काहीही सांगणार नाहीत. तिला ओरडू नकोस हेच सांगतील मला शरद पवार यांचा स्वभाव माहीत आहे. नताशा जे काही म्हणते आहे त्यामागे तिचा विचार आहे. ती वाचन करुनच बोलते. ती जे म्हणाली आहे ते आहे ते काही बदलता येणार नाही. दैव जाणिले कुणी? हे गाणं ऐकत होतो. ते चुकून स्टेटसला गेलं त्याला काही अर्थ नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

- Advertisement -

यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले की माझ्यासाठी सत्ता म्हणजे शरद पवार आहेत. त्यामुळे सत्ता, सर्वस्व, राज्य हे सोडून द्या. माझ्यासाठी शरद पवार हेच सगळं काही आहेत. विलीनीकरणाबाबत म्हणाल तर त्या चर्चेत मी कधीच नव्हतो. मला कधीही चर्चेत घेतलं गेलं नाही, त्यामुळे विलीनीकरणाबाबत मी काहीही बोलणार नाही. शिवाय शरद पवारांनी जे सांगितलं ते सांगितलं. आता पुढचं नेतृत्व सुप्रियाताई आहेत. सुप्रियाताईंनी सांगितलं म्हणजे विषय संपला. खासदार आणि सुप्रियाताई तसंच शरद पवार यांनी ठरवायचं आहे, डिलिमिटेशनला पाठिंबा द्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय आहे. माझ्यासारख्या छोट्या आमदाराने या विषयात बोलणं योग्य नाही असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

नाट्यकलेच्या २३ रंगांनी सजणार नाशिकचा रंगमंच; आजपासून ६५ वी राज्य मराठी नाट्यस्पर्धा

नताशा आव्हाड यांची पोस्ट काय?
नताशा आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, जर पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याच्या विचारात असेल, तर मी या निर्णयाचा अत्यंत तीव्र शब्दांत निषेध करते. मतदारांची वाढती लोकसंख्या डोळ्यांसमोर ठेवता पुनर्रचना आवश्यक असली, तरी हे प्रस्तावित विधेयक विरोधकांची ताकद आणि मिळणाऱ्या जागांची संख्या जाणीवपूर्वक रोखण्यासाठी आणले गेले आहे. भारतीय जनता पक्षाला राजकीय फायदा मिळवून देण्याचा हा एक प्रकारे घटनाबाह्य आणि सुनियोजित प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

भाजपची घसरत चाललेली लोकप्रियता आणि सत्तेला टिकवून ठेवण्यासाठीचा हा शेवटचा केविलवाणा खटाटोप असल्याचे सांगत, देशाची लोकशाही व्यवस्था शाबूत ठेवायची असेल तर सर्वांनी या बिलाला कडाडून विरोध केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या बिलाला पाठिंबा देणे म्हणजेच थेट देशाशी आणि संविधानाशी प्रतारणा करण्यासारखे आहे. पक्षाने आपल्या या भूमिकेचा गांभीर्याने फेरविचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

Ashok Kharat Case : ३० साक्षीदार अन् ३ हजार पानांचे पुरावे;...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik दैवी शक्तींचे दावे, भविष्याची भीती आणि चमत्कारांच्या अमिषापोटी सामान्य भक्तांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या अशोककुमार एकनाथ उर्फ ‘कॅप्टन’ खरात (Ashok Kharat)...