Sunday, June 23, 2024
HomeधुळेVideo धुळ्यात कानबाई माता विसर्जन मिरवणूकीत जल्लोष

Video धुळ्यात कानबाई माता विसर्जन मिरवणूकीत जल्लोष

धुळे – dhule

- Advertisement -

शहरासह परिसरात काल खानदेश (Khandesh) कुलस्वामिनी कानुबाई (Kanubai) मातेची विधिवत पुजा करून स्थापना करण्यात आली. या उत्सवासाठी बाहेरगावी गेलेले नातलग गावी आले आहेत. भाविकांनी कानुमातेचे दर्शन घेतले. रात्रभर जागरण करण्यात आले. कानुमातेची गित म्हणण्यात आली. तर आज सकाळपासूनच सर्वत्र डीजे (d j) , ढोलताश्यांच्या गजरात कानुमातेला डोक्यावर घेवून मिरवणूकांना सुरूवात झाली.

त्यात महिलांनी फुगड्या खेळल्या. तर कानुमातेच्या गितांवर सर्वांनीच ठेकाही धरला. यंदा पांझरा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे भाविकांनी पांझर नदीत कानुमातेचे विसर्जन करीत भावपुर्ण निरोप दिला. सायंकाळपर्यंत विसर्जन मिरवणूका सुरू राहतील. त्यामुळे शहरात सर्वत्र भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या