Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाजागतिक जम्परोप अजिंक्यपद स्पर्धा : नाशिकच्या चार खेळाडूंची भारतीय संघात निवड

जागतिक जम्परोप अजिंक्यपद स्पर्धा : नाशिकच्या चार खेळाडूंची भारतीय संघात निवड

नाशिक । प्रतिनिधी Nashik

कोलोरॅडो, अमेरिका येथे होणार्‍या जागतिक जम्परोप अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून त्यात नाशिकचे चार खेळाडू आणि एक प्रशिक्षक तर डोंबिवलीचे नऊ खेळाडू आणि एक प्रशिक्षक अशी निवड झाली आहे. तसेच छत्रपती पुरस्कारप्राप्त अशोक दुधारे यांना संघप्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे.

- Advertisement -

थायलंड येथे नोव्हेंबर 2022 मध्ये थायलंड ओपन जम्परोप अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. तेथे महाराष्ट्रातील खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व करत पदकांची लयलूट करून जागतिक जम्परोप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले. कोलोरॅडो अमेरिका येथे दि. 16-23 जुलैदरम्यान जागतिक जम्परोप स्पर्धा पार पडणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

निवड झालेले खेळाडू

नमन गंगवाल, राजूल लुंकड, नियती छोरिया, मारवी हिरण, तन्मय कर्णिक (प्रशिक्षक) सर्व नाशिक. भूमिका नेमाडे, तन्वी नेमाडे, मनस्वी पाटील, योगिता सामंत, अंकिता महाजन, पद्माक्षी मोकाशी, स्वराली कुंभार, मानस मुंगी, ईशान पुथरण, अमन वर्मा (प्रशिक्षक) सर्व डोंबिवली. निवड झालेले खेळाडू वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये भाग घेतील.

नमन गंगवाल- फ्री स्टाईल, राजूल लुंकड- ट्रिपल अंडर, नियती छोरिया- डबल अंडर, मारवी हिरण- 3 मिनीट इंदुरान्स,भूमिका नेमाडे- 30 सेकंड स्पीड, तन्वी नेमाडे- व्हील फ्री स्टाईल, योगिता सामंत- डबल डच फ्री स्टाईल,मनस्वी पाटील-डबल अंडर रिले, अंकिता महाजन- डबल अंडर रिले, स्वराली कुंभार- स्पीड रिले, पद्माक्षी मोकाशी – स्पीड रिले, इशान पुथरण- व्हील फ्री टाईल, मानस मुंगी- डबल डच फ्री स्टाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या