Wednesday, February 4, 2026
Homeमुख्य बातम्याKabutar Khana Dadar : कबुतरखाना बंदी समर्थनात मराठी एकीकरण समिती आक्रमक; पोलिसांनी...

Kabutar Khana Dadar : कबुतरखाना बंदी समर्थनात मराठी एकीकरण समिती आक्रमक; पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना घेतलं ताब्यात

मुंबई | Mumbai

मराठी एकीकरण समितीने (Marathi Ekikaran Samiti) आज (बुधवारी) दादरमधील (Dadar) कबूतरखाना परिसरात आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर कबूतरखाना परिसरातील दुकाने दुपारी एक वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी (Police) दिले आहेत. तसेच, जैन मंदिराचा मुख्य दरवाजाही बंद ठेवण्यात आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समिती दादर परिसरात पोहोचले असून आक्रमक झाले आहेत

- Advertisement -

दुसरीकडे आधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून (Dadar Police) नोटीसा देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मराठी एकीकरण समितीने पोलिसांकडून मुस्कटदाबी होत असल्याचे म्हटले असून, आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धडपकड केली जात आहे. तसेच मराठी एकीकरण समितीचे प्रमुख गोवर्धन देशमुख (Govardhan Deshmukh) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

YouTube video player

दरम्यान, जैन समाजाचे जे मंदिर कबूतरखान्यासमोर आहे, त्याचा मुख्य दरवाजा नेहमी चालू असतो, तो आज बंद ठेवण्यात आला आहे. त्याच्यासमोरही पोलिसांची तुकडी तैनात आहे. बाजूच्या रस्त्यातून जैन धर्मीय मंडळींना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. तर मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनच्या ठिकाणी दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले आहे. सहा ऑगस्टच्या आंदोलनाला (Agitation) प्रत्युत्तर म्हणून आजचे आंदोलन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime : मॉलमधून मोबाईल चोरणारा चोरटा अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पाथर्डी फाटा (Pathardi Phata) येथील मॉलमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ने मुसक्या आवळून...