Saturday, May 25, 2024
Homeनगरकडित शिवारात 2 ब्रास वाळुसह ट्रॅक्टर पकडला

कडित शिवारात 2 ब्रास वाळुसह ट्रॅक्टर पकडला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील कडित शिवारात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने वाळुची विनापरवाना वाहतुक करणारा ट्रॅक्टर दोन ब्रास वाळुसह जप्त केला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी हा पसार आहे.

- Advertisement -

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना राजेश उर्फ बाल्या वडीतके (रा. कडीत, ता. श्रीरामपूर) हा विना नंबरच्या महिंद्रा ट्रॅक्टर ट्रॉलीमधून कडीत शिवारातून शासकीय वाळुची विनापरवाना वाहतूक करणार असल्याचे समजल्याने त्यांनी घटनास्थळी पोलीस पथक पाठविले.

पथकास रात्री सव्वा वाजेच्या सुमारास बेलापूर रोडने एक ट्रॅक्टर येताना दिसला. पोलिसांना पाहिल्यानंतर ट्रॅक्टर चालकाने आधीच ट्रॅक्टर थांबवून तो पळून गेला. सदर चालकाचे नाव राजेश उर्फ बाल्या वडीतके असे असल्याचे समजले आहे. 5 लाख रुपये किंमतीचा लाल रंगाचा महेंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व 20 हजार रुपये किंमतीची 2 ब्रास वाळु असा 5 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार मनोज गोसावी, पोना सचिन आडबल, रवींद्र कर्डिले, पो.कॉ. बाळासाहेब गुंजाळ यांच्यासह कोल्हार दुरक्षेत्राचे स.फौ. बी.एम लबडे, पोहेकॉ श्री. चव्हाण आदींच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या