नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कादवा (Kadwa) सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Election) दिंडोरी गटात श्रीराम शेटे (Shriram Shete) यांच्या गटाचे तीनही उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली आहे….
त्यात प्रामुख्याने दिनकर मुरलीधर जाधव 6676, बाळासाहेब जाधव 6404, शहाजी माणिकराव सोमवंशी 6277 हे आघाडीवर आहेत. तर त्यांचे निकटचे प्रतिद्वंदी अनील भिकाजी जाधव 4193, प्रमोद शिवाजी देशमुख 4130, श्रीपाद भिका बोरस्ते 4043, प्रविण एकनाथ जाधव 114, दिलीप पंढरीनाथ जाधव 66 ते पराभवाच्या छायेत आहेत.
मातेरेवाडी गटाचेही निकाल हाती लागले असून यात कादवा विकास पॅनलचे उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत. श्रीराम सहादू शेटे 6887, दादासाहेब नथु पाटील 6206, निवृत्ती मातेरे 3925, सुरेश रामभाऊ डोखळे 4687 हे आघाडीवर आहेत.
कादवा कारखाना निवडणूक : श्रीराम शेटे विजयी
निवडणुकीच्या निकालाची गती लक्षात घेता कादवा विकास पॅनलचे उमेदवार विजयाच्या दिशेने घोडदौड करताना दिसून येत आहेत. उर्वरित गटांची मतमोजणी लवकरच हाती येईल.