Wednesday, May 28, 2025
HomeनगरAkole : काजवा महोत्सवाला पावसाचा तडाखा; पर्यटकांची निराशा

Akole : काजवा महोत्सवाला पावसाचा तडाखा; पर्यटकांची निराशा

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

- Advertisement -

यंदा सलग सुरु असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने काजव्यांच्या प्रजनन प्रक्रियेतच अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे या परिसरात अद्यापपर्यंत काजव्यांचे दर्शनच घडत नसल्याने पर्यटकांचा मोठा हिरमोड होत असून त्यांना निराश मनाने माघारी परतावे लागत आहे. अवकाळीचा मुक्काम वाढून यंदा वेळेपूर्वीच राज्यात मान्सूनही दाखल झाल्याने यावेळच्या काजवा महोत्सवाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

भंडारदरा धरणाच्या परिसरात पर्यटकांची मोठी रेलचेल असते. त्यामागे कारण असते मान्सूनच्या आगमनापूर्वी या भागात रंगणारा प्रकाशोत्सव. वळवाच्या एखाद्या सरीनंतर निर्माण होणार्‍या वातावरणात कळसूबाई-हरिश्चंद्रगडाच्या अभयारण्यात काजवे चमकू लागतात. जमिनीवर आणि पानाफुलांवर रेंगणार्‍या माद्यांना आकर्षित करण्यासाठी हजारो-लाखो चमचमणारे जीव समूहाने जेव्हा या झाडावरुन त्या झाडावर जातात त्यावेळी हा अनुभव साक्षात तारांगण भूईवर अवतरल्याचा आभास निर्माण करणाराच असतो. त्याचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी राज्याच्या कानाकोपर्‍यातून हजारो पर्यटक भंडारदर्‍याच्या परिसरात दाटी करतात.

ग्रीष्मऋतू संपण्याचा कालावधी म्हणजे भंडारदरा धरणाच्या परिसरात निसर्गाचा चमत्कार अनुभवण्याचा काळ समजला जातो. सुमारे महिनाभराच्या या ठराविक काळात भंडारदरा, रतनवाडी, घाटघर आणि कळसूबाई या परिसरातील हजारो झाडांवर आणि वृक्षवेलींवर अचानक चमचमणारे हजारो-लाखोंच्या संख्येतील काजवे दिसू लागतात. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील उर्वरित भागांसह अकोले तालुक्यातही सर्वदूर अवकाळी पाऊस कोसळत आहे. भंडारदरा धरणाच्या परिसरात या पावसाला अधिक जोर असल्याने काजव्यांसाठी पोषक वातावरण तयार होवू शकलेले नाही. त्याचा परिणाम अपेक्षित कालावधी उलटूनही अद्याप या परिसरात कोठेही काजव्यांचे दर्शन घडलेले नाही. त्यातच सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा मुक्काम पुढील काही दिवस वाढणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मे महिन्यात दक्षिणेतील नद्यांना पूर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar धो-धो पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यात जिल्ह्यातील दक्षिण भागातील नद्यांना पूर आला आहे. नगर शहरात सीना नदी, तालुक्यात मेहकरी नदी, श्रीगोंदे तालुक्यात...