Tuesday, January 6, 2026
Homeनगरपालकमंत्र्याच्या मध्यस्थीने काकडीतील प्रकल्पग्रस्तांचे उपोषण मागे

पालकमंत्र्याच्या मध्यस्थीने काकडीतील प्रकल्पग्रस्तांचे उपोषण मागे

मुख्यमंत्र्याशी बोलून प्रश्न मार्गी लावणार

रांजणगाव देशमुख |वार्ताहर|Ranjangaon Deshmukh

काकडी येथील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना ठेकेदारी ऐवजी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नोकरी देण्यासाठी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याने काकडीत मंगळवारी सकाळी 10 जणांनी सुरू केलेले आमरण उपोषण रात्री दहा वाजता मागे घेतले. मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते लिंबूपाणी देण्यात आले. यावेळी माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील उपस्थित होते.

- Advertisement -

शिर्डी विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने महाराष्ट्र शासन अंगीकृत उपक्रमांतर्गत दिल्ली व कोलकत्त्यात एविएशन अग्रिशमनचे प्रशिक्षण दिले होते. प्रशिक्षणानंतर नोकरी देण्याचे लेखी आश्वासन विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आले मात्र ते पाळले जात नसल्यामुळे काकडीतील प्रकल्पग्रस्तांच्या मुलांनी मंगळवारी उपोषण सुरू केले होते. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत व न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार असून या मुलांना शिर्डी विमानतळात नोकरी दिली जात नाही तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका या उपोषणकर्त्यांनी घेतली होती.

YouTube video player

महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या शिफारशीने एविएशन अग्रिशमन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रकल्पग्रस्त लाभार्थींना कोणत्याही ठेकेदाराद्वारे न घेता महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातूनच कामावर घेतले जावे. उपोषण सुरू झाल्यानंतर संजिवनी स्वयंसेवक महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली होती. कानिफनाथ गुंजाळ, वैभव भालेराव, गणेश गुंजाळ, धनंजय कांडेकर, योगेश गुंजाळ, जालिंदर सोनवणे, धनराज डांगे, महेश ढवळे, किरण कांदळकर, प्रदीप गुंजाळ हे दहा जण उपोषणास बसले होते.

विमानतळ विकास प्राधिकरणाने दिलेली आश्वासने पाळणे गरजेचे आहे. सातत्याने आम्हाला आंदोलन करायला लावू नये. ग्रामपंचायतीचा थकीत कर लवकर द्यावा. आम्ही आमच्या मुलांना नोकर्‍या मिळतील म्हणून अगदी कमी किमतीत विमानतळास जमिनी दिल्या. या दहा मुलांना तातडीने प्राधिकरणाद्वारेच नोकरी द्यावी.
– कानिफनाथ गुंजाळ (शेतकरी)

ताज्या बातम्या

Nashik News : पोलिसांच्या सतरा सेवा ‘ऑनलाईन’; ‘आपले सरकार’ पोर्टलवर सुविधा

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध सेवा मिळाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 'आपले सरकार' पोर्टलवर पोलिसांच्या गृह विभागास प्राधान्य...