Thursday, June 20, 2024
HomeUncategorizedVisual Story : काळाराम मंदिर सत्याग्रह : हजारो भीमसैनिकांची मिरवणूक अन् गोदाघाटावरील...

Visual Story : काळाराम मंदिर सत्याग्रह : हजारो भीमसैनिकांची मिरवणूक अन् गोदाघाटावरील सभा

२ मार्च १९३० काळाराम मंदिर सत्याग्रह (Kalaram Mandir Satyagrah) ही एक क्रांतिकारक घटना मानली जाते. जातिव्यवस्थेच्या बुरुजाला सुरूंग लावण्याचे काम या घटनेने केले.

- Advertisement -

राज्य शासनाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड (Dadasaheb Gaikwad) जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक समिती स्थापन केली. या समितीने सरकारकडे पाठपुरावा करून अनेक योजना राबवल्या.

काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करून देणारा कीर्तिमान शिलालेख उभारण्याचे काम याच समितीने केले आहे.

काळाराम मंदिर (Kalaram Mandir) सत्याग्रहाबाबत देवळाली (Deolali) येथे १७ नोव्हेंबर, १९२९ ला सभा घेण्यात आली. या सभेचे अध्यक्ष संभाजी रोकडे (Sambhaji Rokade) तर भाऊराव उर्फ दादासाहेब गायकवाड हे चिटणीस असल्याचे सांगितले जाते. सत्याग्रहाची पहिली रुपरेषा येथेच ठरली असे म्हटले जाते.

२ मार्चपर्यंत आठ हजार भीमसैनिक सत्याग्रहात सामील होण्यासाठी दाखल झाले. तेव्हा नाशिकचे जिल्हाधिकारी आर. डी. गार्डन होते.(nashik collector R D Garden)

नाशिक धुमसत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यांनी आयुक्त घोषाळ (Commissioner Ghoshal) यांना रिपोर्ट करत याबाबतची माहिती दिली.

बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली २ मार्चला सकाळी १० वाजता सभा भरविण्यात आली. तीन वाजता १५ हजार लोकांची एक मिरवणूक निघाली. मिरवणूक गोदावरीच्या घाटाकडे वळली.

यानंतर सत्याग्रहींच्या चार तुकड्या पाडल्या गेल्या. प्रत्येक तुकडीत दीडशे सत्याग्रही होते. या तुकड्या मंदिराच्या चारही दरवाजावर सकाळपासून ठाण मांडून बसल्या होत्या.

चार खंदे सरदार मंदिराच्या चारही दिशांवर आपापल्या आघाड्या सांभाळत होते. बाबासाहेब अन् भाऊराव हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणी सगळी व्यवस्था पाहात होते.

१९३० वर्ष नवीन विचारांचे, प्रतिकाराचे, पराक्रमाचे व दोन जगप्रसिद्ध सत्याग्रहाचे म्हणून भारताच्या इतिहासात अनंतकाळापर्यंत आठवले जाणारे वर्ष मानले जाते.

२ मार्च १९३० ला बाबासाहेबांनी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू केला आणि तिकडे १२ मार्च १९३० मध्ये महात्मा गांधींनी दांडीयात्रा सुरू केली. गांधीचा लढा राजकीय होता, तर बाबासाहेबांचा सामाजिक होता.

(सर्व फोटो : सोशल मीडिया)

- Advertisment -

ताज्या बातम्या