Thursday, April 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSahitya Akademi Awards: 'काळ्यानिळ्या रेषा' आत्मचरित्रासाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार...

Sahitya Akademi Awards: ‘काळ्यानिळ्या रेषा’ आत्मचरित्रासाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
साहित्य अकादमीने आज (दि. १६ मार्च) २४ भारतीय भाषांमधील आपले वार्षिक पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये आत्‍मचरित्र श्रेणीत राजू बाविस्‍कर यांच्‍या ‘कळ्यानिळ्या रेषा’) पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. यंदा प्रतिष्ठित सन्मानासाठी आठ काव्यसंग्रह, चार कादंबऱ्या, सहा कथासंग्रह, दोन निबंधात्मक कार्ये, एक साहित्यिक समीक्षा, एक आत्मचरित्र आणि दोन आठवणींच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे.

ज्यामध्ये एक स्मृतीचिन्ह (कोरीव ताम्रपट), एक शाल आणि १ लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे . ३१ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या सादरीकरण समारंभात पुरस्कार विजेत्यांना प्रदान केला जाईल.

- Advertisement -

साहित्य अकादमी पुरस्कारार्थींची संपूर्ण यादी
काव्यसंग्रह
या श्रेणीमध्ये ‘श्रेष्ठ कविता’ (बंगाली), ‘ठाकूर सत्सयी’ (डोगरी), ‘भट्टखडकी’ (गुजराती), ‘नजदवानैक्य पोत आलव’ (काश्मिरी), ‘पदापुराण’ (ओडिया), ‘प्रस्थानचतुष्टये ब्रह्मघोष:’ (संस्कृत), नंदिनी सिधा रेड्डी यांचा ‘अनिमेषा’ (तेलगू) आणि ‘सफर जारी है’ (उर्दू) यांचा समावेश आहे.

कादंबरी
पुरस्कारासाठी निवडलेल्या कादंबऱ्यांमध्ये ‘कर्ही खेलर साधू’ (आसामी), ‘द्वंग्नवी लामा म्वन्से गाथ्वन’ (बोडो), ‘क्रिम्सन स्प्रिंग’ (इंग्रजी) आणि ‘मायामानुष्यार’ (मल्याळम) यांचा समावेश आहे.
कथासंग्रह
कथासंग्रह श्रेणीमध्ये ‘दादा सीरिसू तंदे’ (कन्नड), ‘कांगलामद्रिबा इफूत’ (मणिपुरी), ‘सेफ्टी किट’ (पंजाबी), ‘भरखमा’ (राजस्थानी), ‘मिड बिरना चेन्ने साओन इनाग सगाई’ (संताली) आणि ‘वाघू’ (सिंधी) यांनी विजय मिळवला आहे.

अमेरिकेचा मोठा हल्ला; चाबहारवर एअर स्ट्राईक, भारताच्या गुंतवणुकीवर टांगती तलवार

इतर श्रेणी
निबंध:
‘कोंकणी काव्यम: रुपाणी आणि रुपाकाम’ (कोंकणी) आणि ‘नेपाळी पारंपारिक संस्कृती रा सभ्यता को डुकुटी’ (नेपाळी).

साहित्यिक समीक्षा: ‘तमिळ सिरुकथाईन थाडंगल’ (तमिळ).

आठवणी (Memoirs): ‘जीते जी अलाहाबाद’ (हिंदी) आणि ‘धात्री पात सन गाम’ (मैथिली).

ताज्या बातम्या

Shirdi : भोंदू खरातच्या ताब्यासाठी शिर्डी पोलिसांची न्यायालयात धाव

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डी आणि सिन्नर येथील पतसंस्थांमध्ये शेकडो बोगस खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा पांढरा करणार्‍या भोंदूबाबा अशोक खरात च्या मुसक्या आवळण्यासाठी शिर्डी...