Monday, June 22, 2026
Homeदेश विदेशअमेरिकेचा मोठा हल्ला; चाबहारवर एअर स्ट्राईक, भारताच्या गुंतवणुकीवर टांगती तलवार

अमेरिकेचा मोठा हल्ला; चाबहारवर एअर स्ट्राईक, भारताच्या गुंतवणुकीवर टांगती तलवार

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इराण आणि अमेरिका युद्धाचा आज १७ वा दिवस आहे. अमेरिका इस्रायल आणि इराण तिन्ही देशांकडून मोठे क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. या युद्धात सर्वात जास्त धक्का आणि नुकसान इराणचे होईल, असे सुरूवातीला वाटत होते. मात्र, आता डाव उलटा पडला असून थेट अमेरिकाच कोंडीत सापडली आहे. अमेरिकेला या युद्धात अनेक धक्के बसत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी काही देशांकरिता इराणकडून बंद करण्यात आली आहे, यामुळे जगात गंभीर तेलसंकट निर्माण झाले आहे. त्यातच आता या देशांच्या युद्धातून भारताला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेने इराणच्या चाबहार बंदरावर मोठा हल्ला केला आहे. अमेरिकन लढाऊ विमानांनी इराणच्या चाबहार व्यापार क्षेत्राजवळील एका डोंगरावर असलेल्या लष्करी तळांवर हल्ला केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यामुळे आखातात खळबळ उडाली असून, भारताच्या कोट्यवधींच्या गुंतवणुकीवरही टांगती तलवार निर्माण झाली आहे.

डोंगररांगांमधील तळांना केले लक्ष
खासगी वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन लढाऊ विमानांनी चाबहार व्यापारी क्षेत्राच्या मागील बाजूस असलेल्या डोंगराळ भागाला लक्ष्य केले. येथे इराणच्या ‘कुद्स फोर्स’चे भूमिगत तळ आणि शस्त्रागारे असल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यानंतर चाबहार परिसरात प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आले. विशेष म्हणजे, ११ मार्च रोजी देखील याच भागातील आयआरजीसीच्या नौदलाच्या तळांवर हल्ला झाला होता, त्यानंतर झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे.

- Advertisement -

Baramati bypoll: बारामतीच्या पोटनिवडणुकीत मविआ उमेदवार देणार? नवी माहिती आली समोर, संजय राऊत म्हणाले…

भारतासाठी चाबहार बंदर महत्वाचं
इराणचे चाबहार बंदर भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. भारत पश्चिम आशिया आणि युरोपशी व्यापार करण्यासाठी या बंदराचा वापर करतो. गेल्या अनेक वर्षांपासून भारत सरकारने या बंदराच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. काँग्रेसच्या कम्युनिकेशन विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी रविवारी सोशल मीडियावर एक शेअर पोस्ट केली. सरकारने चाबहार प्रकल्पाबाबतची परिस्थिती स्पष्ट करावी आणि भारत अजूनही या प्रकल्पात सहभागी आहे का हे सांगावे. जर असे झाले नाही तर ते भारतासाठी एक मोठा धोरणात्मक धक्का आहे असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हंटले आहे.

म्हणून अमेरिकेकडून चाबहार लक्ष
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून जागतिक तेल पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने चाबहारवर हल्ला केल्याचे मानले जात आहे.
चाबहार हे इराणचे एकमेव बंदर आहे ज्याचा थेट संपर्क हिंद महासागराशी येतो. येथूनच इराण आफ्रिकी आणि आशियाई देशांतील आपल्या समर्थक संघटनांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा करतो. चाबहारवर हल्ला करून अमेरिका इराणची पर्यायी पुरवठा साखळी आणि लष्करी रसद तोडण्याचा प्रयत्न करत आहे.

भारताला मोठा धोका?
चाबहारमधील हा हल्ला भारतासाठी अत्यंत संवेदनशील आहे. भारताने येथील ‘शहीद बेहश्ती’ टर्मिनलमध्ये मोठी गुंतवणूक केली असून, हा मार्ग भारतासाठी अफगाणिस्तान आणि मध्य आशियाचे प्रवेशद्वार आहे. जर अमेरिकेचे हल्ले थेट बंदर क्षेत्रापर्यंत पोहोचले, तर भारताच्या ‘इंटरनेशनल नॉर्थ-साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर’ला (INSTC) मोठा फटका बसू शकतो.

ताज्या बातम्या

Jalgaon MLC Election : जळगाव विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे महाजन विजयी; मविआच्या...

0
जळगाव | प्रतिनिधी | Jalgaon विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून अपेक्षेप्रमाणे महायुतीचे (Mahayuti) नंदकिशोर महाजन (Nandkishor Mahajan) मोठया मतधिक्याने विजयी झाले आहे. महाजन...