Tuesday, May 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजकल्याणमध्ये बिल्डींगचा स्लॅब कोसळला; ढिगाऱ्याखाली दबून ६ जणांचा मृत्यू, मृतांत दीड वर्षाच्या...

कल्याणमध्ये बिल्डींगचा स्लॅब कोसळला; ढिगाऱ्याखाली दबून ६ जणांचा मृत्यू, मृतांत दीड वर्षाच्या चिमुकलीचाही समावेश

कल्याण | Kalyan
कल्याण आणि डोंबिवली परिसरात काही दिवसांपूर्वी इमारतीचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली होती. त्यानंतर आता कल्याणमध्ये इमारतीचे काम सुरू असताना एक दुर्दैवी घटना घडली. कल्याण पूर्वमधील चिकणी पाडा परिसरात चार मजली इमारत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एका दीड वर्षाच्या चिमुरडीचा समावेश आहे. या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

कल्याण पूर्व मंगलराघो नगर परिसरातील सप्तशृंगी या इमारतीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या चार मजली इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर डागडुजीचे काम सुरू होते. त्यावेळी त्याचा स्लॅब कोसळला. तो थेट तळमजल्यापर्यंत कोसळला. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. त्यामुळे या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली.

बिल्डींगच्या स्लॅब खाली अडकून सुरुवातील तीन महिलांचा मृत्यू झाला तर एका दीड वर्षांच्या मुलीचाही यात मृत्यू झाला अशी माहिती समोर आली. नंतर ढिगाराखाली आणखी ३ जणांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत एकूण ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर त्या ठिकाणी अग्निशनम दल, महापालिकेचे पथक पोहोचले. सुरुवातीला आठ जणांना या ढिगाऱ्याकडून बाहेर काढण्यात आले. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एक दीड वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. इतर दोन जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, दुर्घटना घडलेली सप्तश्रृंगी इमारत ४० वर्षे जुनी असून धोकादायक इमारतींच्या यादीत आहे. तसे महापालिकेकडून जाहीर केलेले असून, नोटीसही बजावण्यात आलेली होती. नागरिकांना मान्सून पूर्वी इमारत रिकामी करण्यास सांगण्यात आलेले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : अपहरण कटात सराईत; गुन्हे शाखेकडून संशयितास अटक

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik एप्रिल महिन्यात काठे गल्ली (Kathe Galli) सिग्नल येथून व्यावसायिकाचे कट रचून अपहरण (Kidnapping) केल्यावर त्याच्या भावांकरवी १५ लाखांची खंडणी उकळल्याच्या...