Wednesday, February 4, 2026
Homeमहाराष्ट्रकल्याणमध्ये घाटकोपरची पुनरावृत्ती? महाकाय होर्डिंग कोसळले… अनेक वाहने दबली, थरारक VIDEO समोर

कल्याणमध्ये घाटकोपरची पुनरावृत्ती? महाकाय होर्डिंग कोसळले… अनेक वाहने दबली, थरारक VIDEO समोर

कल्याण । kalyan

काही दिवसांपूर्वी घाटकोपर येथे होर्डिंग (Ghatkopar Hoarding Collapse) कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. याच घटनेची पुनरावृत्ती कल्याणमध्ये (Kalyan) होता होता टळली.

- Advertisement -

कल्याणच्या सहजाणंद चौकात शुक्रवारी सकाळच्या सुमारास भलं मोठं होर्डिंग कोसळून अपघात झाला आहे. यामध्ये अनेक वाहने होर्डिंगखाली अटकली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, होर्डिंगखाली दबल्याने २ जण जखमी झाले.

YouTube video player
कल्याणमध्ये घाटकोपरची पुनरावृत्ती? महाकाय होर्डिंग कोसळले… अनेक वाहने दबली, थरारक VIDEO समोर

हे हि वाचा : वेषांतरांच्या आरोपांवर अजितदादा भडकले; म्हणाले, तर मी राजकारण सोडेन…

सहजानंद चौकात होर्डिंग कोसळल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीस या घटनास्थळी आले असून होर्डिंग हटवण्यासाठी अग्निशमन दलाचं पथकही आलं. या होर्डिंगखाली दहा ते बारा दुचाकी आहेत. तसेच एक चारचाकी गाडीदेखील आहे.

सुदैवाने चारचाकीतील चालक होर्डिंग पडण्याच्या काहीवेळ आधीच गाडीतून बाहेर पडला होता. होर्डिंग कोसळल्याने वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या होर्डिंगजवळ रुग्णालयासहित अनेक दुकाने समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

हे हि वाचा : Paris Olympic 2024 : भारताला मोठा धक्का! पी.व्ही. सिंधूची पॅरिस ऑलिम्पिकमधून…

ताज्या बातम्या

Nashik News : पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद (Zilla Parishad) स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर...