Thursday, November 21, 2024
Homeनगरकल्याण मरकड यांच्या मारेकर्‍यांना फाशी द्यावी

कल्याण मरकड यांच्या मारेकर्‍यांना फाशी द्यावी

तिसगावमध्ये कडकडीत बंद

तिसगाव |वार्ताहर| Tisgav

रविवारी तिसगाव येथील व्यापार्‍यांनी मयत कल्याण मरकड यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व या घटनेचा निषेध म्हणून गावात दुकान बंद ठेवून सामुहिक श्रद्धांजली अर्पण केली. तसेच तिसगावच्या आठरा पगड जातीतील लोकांना व व्यवसायिकांना संरक्षण द्यावे. मरकड यांचा खून करणार्‍यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांच्या कुटूंबाच्यावतीने करण्यात आली.

- Advertisement -

पाथर्डी तालुक्यातील मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या तिसगाव येथील व्यावसायिक मरकड या युवकाचा गोळी झाडून निर्घुनपणे खून करण्यात आला. त्यानंतर तिसगावमधील वाढलेले गँगवार किती भयानक आहे, याची प्रचितीच आली आहे. मरकड याचा दीपावलीच्या दिवशी गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्यानंतर पंकज मगर, अमोल गारूडकर, इरशाद शेख या तीन आरोपींना पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या. हा खून कोणत्या कारणामुळे झाला. याबाबत लटसुलट चर्चा तिसगावसह परिसरात सुरू आहे. तिसगावमधील तरुणांचे गुन्हेगारी दिशेने पडणारे पाऊल आणिभंग होत चाललेली शांतता, यामुळे सर्वसामान्य नागरिकासह छोटे-मोठे व्यवसायिक अस्वस्थ आहेत.

वाढत्या गुन्हेगारीच्या घटना थांबाव्यात, पोलिसांनी यामध्ये लक्ष घालावं आणि तिसगावमध्ये शांतता राहावी अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे. विधानसभेची निवडणूक लक्षात घेता गावातील व्यापार्‍यांनी पुढार्‍यांना या बंदपासुन बाजूला ठेवलं होतं. घडलेली घटना दुर्दैवी असून त्या पुन्हा तिसगावमध्ये घडू नये व शांतता अबाधित राहावी, अशी मागणी यावेळी व्यावसायिकांनी केली. मरकड यांचा गोळ्या झाडून खून करणार्‍या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या घटनेत आरोपींना अटक करावी, अशी मागणी मरकड यांच्या कुटुंबातील भास्करराव मरकड, लताबाई मरकड यांनी केली. तर अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी भावना रफिक शेख व शंकरराव उंडाळे यांनी व्यक्त केली. या बंदप्रसंगी तिसगावमधील सर्व व्यापारी सहभागी झाले. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या