Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik News : प्रेस वर्क्स कमिटीच्या निवडणुकीत कामगार पॅनलचा विजय

Nashik News : प्रेस वर्क्स कमिटीच्या निवडणुकीत कामगार पॅनलचा विजय

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

मजदूर संघ निवडणुकीच्या निकाला पाठोपाठ प्रेस वर्क्स कमिटीच्या (Press Works Committee) निवडणुकीत सुद्धा येथील इंडिया सेक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेसमध्ये कामगार पॅनलने आपली सत्ता कायम राखली असून या निकालानंतर कामगार पॅनलच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. या निवडणुकीत सुद्धा आपला पॅनलचा धुव्वा उडाला आहे.

- Advertisement -

येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेसमधील मजदूर संघ वर्क्स कमिटीच्या निवडणुकीसाठी (Election) शनिवारी मतदान झाले होते. सुमारे ९५ टक्के कामगारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवला होता. या मतदानानंतर रविवारी मजदूर संघाच्या निवडणुकीचे मतमोजणी झाली होती. त्यात कामगार पॅनलने २९ जागा जिंकून एक हाती सत्ता मिळविली.

हे देखील वाचा : ISP & CNP मजदूर संघ निवडणुक : कामगार पॅनलला घवघवीत यश

दरम्यान रविवारी मजदूर संघाचा (Mazdoor Sangh) निकाल लागल्यानंतर आज सोमवारी सकाळी करन्सी नोट प्रेस व इंडिया सिक्युरिटी प्रेसमधील विविध विभागात वर्क्स कमिटीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीपासूनच दोन्ही प्रेसमध्ये कामगार पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते. सायंकाळी पाच वाजेला संपूर्ण निकाल घोषित करण्यात आला.

तसेच दोन्ही प्रेसमध्ये ज्याप्रमाणे मजदूर संघाच्या निवडणुकीत कामगार पॅनल विजयी झाले त्याचप्रमाणे वर्क्स कमिटीच्या निवडणुकीत सुद्धा कामगार पॅनलने दोन्ही प्रेसमध्ये आपला पॅनलचा धुव्वा उडविला आहे. कामगार पॅनलचे नेतृत्व मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे व खजिनदार अशोक पेखळे यांनी केले.

हे देखील वाचा : Nashik News : हुल्लडबाजांवर कारवाई; चार ठिकाणी नाकाबंदी

दरम्यान, या निवडणुकीत कामगार पॅनलला आयएसपीमध्ये एकूण आठ जागा मिळाल्या तर आपला पॅनलला फक्त तीन जागा मिळाल्या. तसेच करन्सी नोट प्रेसमध्ये एकूण १३ जागेपैकी १२ जागांवर कामगार पॅनलचे उमेदवार निवडून आले आहे. तर आपला पॅनलला फक्त एक जागा मिळाली. या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.

कामगार पॅनलचे आयएसपी मधील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे

भूषण मेढे (५००) बळवंत आरोटे (३८५ ) सोमनाथ काळे (३८०) किशोर गांगुर्डे (३५५ ) रमेश चव्हाण (३५२) योगेश जाधव (३९९) मनोज सोनवणे (३८०) कैलास मुठाळ (४२१) हे कामगार पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.

आपला पॅनलचे विजय उमेदवार पुढीलप्रमाणे

सचिन तेजाळे (४२६) दामू ढोकणे (४४७) किरण गांगुर्डे( ४९३) हे उमेदवार आपला पॅनलचे निवडून आले आहे. त्याचप्रमाणे स्टाफमध्ये तीन जागेवर सुद्धा कामगार पॅनलचे पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत. यात धीरज तिजारे (११८) मनीष गवई (१०५) पार्थ सरदार ( ९७) हे आयएसपीमध्ये निवडून आलेले उमेदवार आहेत.

करन्सी नोट प्रेसमधील कामगार पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे

योगेश कुलवंदे (४०७) अरुण चव्हाणके (४००) दिनेश कदम (३०९) विनोद घाडगे (३६४) सुभाष ढोकणे (३६१) राजेंद्र काजळे (३४७) आप्पाजी जगताप (३४६) कचरू ताजनपुरे (३३९) बाळू डेरिंगे (३३८) संजय गरकळ (३३०) सुनील ढगे (३०८) प्रवीण निकुंभ (२९६) याप्रमाणे कामगार पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत. तर आपला पॅनलचे फक्त अनिल जाधव ३२८ मते मिळवून विजयी झाले आहेत. त्याचप्रमाणे स्टाफमध्ये सुद्धा दोन जागेवर कामगार पॅनल पुरस्कृत सोनू सिंग १०३ व एस माथुर ९७ मते मिळवून विजयी झाले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या