Wednesday, April 2, 2025
Homeमनोरंजनकंगनाचा आरोप : संजय राऊतांकडून मली धमकी

कंगनाचा आरोप : संजय राऊतांकडून मली धमकी

मुंबई :

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरून सतत महाराष्ट्र सरकार आणि पोलीस यांच्यावर आरोप करत असलेली कंगना राणावत हिने आज शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केला आहे.

- Advertisement -

संजय राऊत आपणास मुंबईला येण्यापासून थांबवत आहेत असा तिचा आरोप आहे. एका ट्विट माध्यमातून कंगनाने आरोप केला की, संजय राऊत यांनी आपल्याला थेट धमकी दिलेली आहे, मुंबईला येऊ नको असे सांगितले आहे. आधी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या गेल्या आणि आता थेट धमकी मिळत आहे, पाक व्याप्त काश्मीर सारखी मुंबई मध्ये असुरक्षितता का निर्माण केली जात आहे? असा सवाल कंगना ने केला. ‘या आधी कंगनाने आरोप केला होता की, तिला फिल्म माफिया पेक्षा मुंबई मधल्या पोलिसाची जास्त भीती वाटते आहे

दरम्यान, प्रदेश भाजपाचे प्रवक्ता आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर टीका करताना सांगितले की, राज्य सरकार कंगनाला घाबरत आहे, कंगना नी मुंबईला का यायचे नाही?, सरकारला एवढी भीती का वाटते? कंगना बॉलीवूड आणि माफिया यांच्यामधील संगनमताची भांडाफोड करत आहे, यासाठी तिचे स्वागत करण्याऐवजी राज्य सरकार तिला येण्यापासून थांबवत आहे, कारण सरकारचे पितळ यामुळे उघडे पडु शकते, मात्र धमकी देणार्‍यांनी हे विसरू नये, पूर्ण देश कंगनाच्या पाठीमागे उभा आहे, ती झाशीची राणी आहे, या धमक्यांना घाबरणार नाही. या आधी शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून टीका करताना राऊत यांनी म्हटले की, कंगना मुंबईत राहते आणि मुंबई पोलिसांवर टीका करते, हा विश्वासघातकी पणा आहे, तसेच हे लाजिरवाणे आहे, आम्ही तिला विनंती करतो की तीने मुंबई मध्ये येऊ नये. हा मुंबई पोलिसांचा अपमान आहे, गृहमंत्रालयाने यावर कारवाई केली पाहिजे..

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ०२ एप्रिल २०२५ – कचरा व्यवस्थापन अत्यावश्यकच

0
घनकचरा व्यवस्थापन हा चिंतेचा आणि वादविवादाचा विषय बनला आहे. त्यावर ‘कॅग’च्या अहवालानेही शिक्कामोर्तब केले आहे. घनकचरा व्यवस्थापनात स्थानिक स्वराज्य संस्था अपयशी ठरल्याचा ठपका कॅगने...