Thursday, May 15, 2025
Homeधुळेआमळी येथे कन्हैयालाल महाराज यात्रोत्सवास प्रारंभ

आमळी येथे कन्हैयालाल महाराज यात्रोत्सवास प्रारंभ

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

- Advertisement -

साक्री तालुक्यातील आमळी (Amli) येथील श्री तिर्थक्षेत्र कन्हैयालाल महाराज (Shri Tirtha Kshetra Kanhaiyalal Maharaj) यात्रोत्सवाला (Yatra festival) आजपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी भाविकांची (Crowd of devotees) मोठी गर्दी झाली होती. आ. मंजुळा गावीत यांच्या हस्ते श्री कन्हैयालाल महाराज यांची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. मंदिराच्या आवारातील पावभा महाराजांच्या (temple of Pavbha Maharaj) मंदिराजवळ तुळशी विवाह (Marriage to Tulsi) लावण्यात आला. त्यानंतर श्री कन्हैयालाल महाराजांना ऊस, साखरेचे पेढे चढविण्यात आले.

यात्रेत पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी भेट देत दर्शनाचा लाभ घेतला. साधारत: पाच ते सहा ट्रक खजूर,केळी व नारळाची विक्री झाली. तसेच संसारोपयोगी साहित्य, हॉटेल, खेळणीची दुकाने व गगनचुंबी पाळणे, तमाशा, रोडावलीतून लाखो रूपयांची उलाढाल झाली. आंमळीपासून धनेरपर्यंत व आमळी ते काबर्‍याखडक चौफुली पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तीन किलोमीटरपासून भाविकांना अमळीपर्यंत पायी चालत यावे लागत होते.

माजी आ. गुरुमुख जगवानींसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय सचिन साळुंखे यांनी विशेष पोलीस बल, होमगार्ड, महीला पोलीस कर्मचार्‍यांच्या सहाय्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. याठिकाणी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक येथून लहान-मोठे हॉटेल व्यवसायीकांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत.

आमळी ग्रामपंचायतचीतर्फे व्यावसायिकांना जागा, लाईट व पाण्याची सोय करून देण्यात आली आहे. तर मंदिर व्यवस्थापनाकडून मंदिरात फोटो व पेढे, प्रसाद दुकानांना सोय करून देण्यात आली आहे. कोरोनानंतर दोन वर्षानी यात्रा भरत असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. कन्हैयालाल महाराजांचे मंदिर पुरातन व दगडी बांधकाम आहे. यात्रोत्सवानिमित्त मंदिराला रंगरंगोटी करून मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

दुचाकीत ड्रेसची ओढणी गेल्याने महिला ब्रेनडेड

मंदिरातील मूर्ती ही अखंड पाषाणाचे असून या विष्णू भगवान यांच्या मूर्तीच्या बेंबीतून सतत पाणी पाझरत असते. ही मूर्ती डाकोर येथून मुल्हेर येथे घेऊन जात असताना सेवेकर्‍यांनी येथील चाफ्याच्या झाडाजवळ ठेवून विश्रांती घेतल्यामुळे नंतर या ठिकाणाहून ही मूर्ती उचलली गेली नाही. त्यामुळे आम्ही येथेच मंदिर बांधून आज कन्हैयालाल महाराज मंदिर म्हणून नावारूपाला आल्याची आख्यायिका आहे. येथे हजारो भाविक आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर नवस फेडण्यासाठी येत असतात.

चिनोदा परिसरात टरबूज पिकावर रोगाचा प्रादुर्भाव : शेतकर्‍यांकडून फवारणी

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Accident News : पेठच्या कुंभाळे फाट्यानजीक पुन्हा अपघात; दोघांचा मृत्यू,...

0
पेठ | Peth | वार्ताहर दोन दिवसांपूर्वी ज्या जागेवर मोटरसायकल अपघातात (Bike) २ तरुणांचा मृत्यु (Youth) झाला होता. त्याच ठिकाणाजवळ आज (गुरुवार) पुन्हा दोन मोटरसायकलींची...