Friday, April 25, 2025
Homeदेश विदेशKannauj Accident: आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात; युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू

Kannauj Accident: आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात; युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
उत्तर प्रदेशमधील आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर झालेल्या भीषण अपघातात सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील पाच डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे डॉक्टर लखनौ येथून आग्र्याकडे जात होते. कारवरील नियंत्रण सुटले आणि ती कार डिव्हायडर तोडून पलीकडे असलेल्या ट्रकला धडकली. या अपघातात सैफई वैद्यकीय विद्यापीठाच्या पाच डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पहाटे ३.४३ वाजता नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली की लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेच्या किलोमीटर क्रमांक 196 वर अपघात झाला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्कॉर्पिओ कार आग्र्याला जात होती, झोपेमुळे गाडी डिव्हायडर तोडून आग्रा ते लखनौच्या दिशेने पोहोचली. यानंतर आग्राला बाजूने येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला.

- Advertisement -

अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील डॉक्टर असल्याचे समोर आले आहे. तसेच हे सर्वजण लखनौमधील एका विवाह सोहळ्यात सहभागी होऊन सैफई येथे परतत होतो, अशीमाहिती समोर आली आहे.

या अपघातात पवन कुमार वर्मा यांचा मुलगा अनिरुद्ध वर्मा, राधा विहार एक्स्टेंशन कमला नगर आग्रा, यांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे. अपघातात जखमी झालेल्या डॉ.जयवीर सिंग यांना सैफई मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...