करजगाव |वार्ताहर| Karajgav
नेवासा तालुक्यातील मुळाकाठ परिसरातील करजगाव, पानेगाव, शिरेगाव, अंमळनेर सह परिसरात जोरदार वार्यासह रविवारी साडेचारच्या सुमारास पावसास सुरूवात झाली. तो सातपर्यत चालू होता. करजगाव-पानेगावमध्ये सुमारे दोन तास पावसाने तांडवच मांडले होते.ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वत्र पाणीच पाणी वाहत होते. जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. यामुळे अनेकांची धावपळ उडाली. त्याचप्रमाणे मुळाकाठ परिसरात समाधानकारक पाऊस झाला. जोरदार पाऊस व वार्यामुळे वीजही गायब झाली होती.
- Advertisement -
गेल्या दोन दिवसांपासून असह्य उकाडा होता. कडक उन्हामुळे पिके पाण्यावर आली होती. पाऊस झाल्यामुळे शेतकरी समाधानी झाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान काल सायंकाळी नेवासा व नेवासाफाटा परिसरातही जोरदार पावसाने पिकांना दिलासा मिळाला.