Thursday, November 14, 2024
Homeराजकीयकर्जतमध्ये भाजपला धक्का

कर्जतमध्ये भाजपला धक्का

कर्जत |वार्ताहर| Karjat

माजी मंत्री राम शिंदे आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना जोरदार धक्का देत भाजपाचे

- Advertisement -

माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बापूसाहेब नेटके, नगरसेविका मनीषा सोनमाळी आणि त्यांचे पती सचिन सोनमाळी तालुका उपाध्यक्ष सतीश पाटील आणि डॉ. प्रकाश भंडारी यांनी बुधवारी तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर व राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष नितीन धांडे आणि सुनील शेलार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या घडामोडीचे राजकीय पडसाद भविष्यातील निवडणुकीत उमटणार आहेत. कर्जत येथे सायंकाळी 7 वाजता आ. रोहित पवार यांच्या बंगल्यावर पत्रकार परिषद असल्याचा निरोप देण्यात आला. मात्र त्याचवेळी भाजपचे काहीजण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मीडियात पसरली होती. मात्र कोणाचा प्रवेश देणार याबाबत उत्सुकता होती.

रात्री साडेसात वाजता तालुका अध्यक्ष काकासाहेब तापकीर आल्यानंतर पत्रकार परीषद सुरू करण्यात आली. यावेळी भाजपचे दोन नगरसेवक, माजी तालुका उपाध्यक्ष आणि कर्जत येथील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी तालुका अध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. सुनिल शेलार यांनी प्रस्तावीक केले. यावेळी उद्योजक दादासाहेब थोरात, विजय नेटके, भास्कर भैलुमे, रवी पाटील, मोतीलाल पाटील आदी उपस्थित होते.

नगरसेविका मनिषा सोनमाळी म्हणाल्या, आम्ही मागील एक वर्षापासून आ. रोहित पवार आणि सुनंदा पवार यांच्या सोबत काम करीत आहे. आज भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये अधिकृत प्रवेश करीत आहोत.

उपनगराध्यक्ष बापुसाहेब नेटके म्हणाले, मी भाजपमध्ये होतो त्या ठिकाणी मला चांगला सन्मान मिळाला होता. कोणावरही नाराज नाही, मला माजी मंत्री राम शिंदे आणि प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. पण पक्षाशी एकनिष्ट राहून अनेक कामे केली आहेत. मात्र आता आ. पवार यांच्या नेृत्वाखालील काम करावयाचे आहे. यामुळे मी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

तालुकाध्यक्ष सतिष पाटील म्हणाले, भाजपत गेलो हीच चुक झाली. आज ती चुक दुरूस्त करीत आहे. आगामी नगरंपचायतीच्या निवडणुकीत कर्जतमध्ये आ. पवार यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणण्यासाठी जिवाचे रान करणार आहोत.

डॉ. प्रकाश भंडारी म्हणाले, राजकारणात देखील सुशिक्षत नागरीक आले तर चांगले समाजकरण करता येते ही भूमिका आ. पवार यांची आहे आणि यामुळे केवळ समाजकारण करण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या