Saturday, July 25, 2026
Homeजळगावडॉ.सतीश पाटील यांचे शहरात घरोघरी औक्षण

डॉ.सतीश पाटील यांचे शहरात घरोघरी औक्षण

पारोळा । प्रतिनिधी
शहराचा राजकीय इतिहास पाहता शहर हे कधीही कुण्या व्यक्तीसोबत अखंड कायम राहत नाही, व्यक्ती पाहून कल देणारे हे शहर आहे. विधानसभा निवडणुकीत जे उमेदवार रिंगणात आहेत या सर्वांची नावे पाहता मतदारांच्या मनात संताप आहे. त्यामुळे रक्तात गद्दारी नसलेले, निष्ठावंत, जो शब्द दिला तो पाळणारा व्यक्ती आणि प्रगल्भ विचारसरणीचे उमेदवार डॉ.सतीश अण्णा पाटील हे असल्यामुळे पारोळा शहरवासियांच्या मनात त्यांनी घर केले आहे.

शहरात वेगळाच अनुभव पहावयास मिळाला, डॉ.सतीश पाटील यांचे घरोघरी औक्षण करण्यात आले. श्री बालाजी महाराज यांचा आशीर्वाद घेवून पारोळा शहरात प्रचार रॅलीला सुरुवात झाली. प्रचार रॅलीत हातात तुतारी घेवून अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. चौरंगी लढत या मतदार संघात आहे. परंतु इतर उमेदवारांचे चेहरे पाहता डॉ. सतीश पाटील यांना मतदारांनी पसंती क्रमांक एक दिला आहे.

ताज्या बातम्या

राजीनामा

मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा; CJP आंदोलनाला...

0
मुंबई | Mumbai जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी...