Saturday, May 4, 2024
Homeनगरकर्जत नगरपंचायतीत 13 अर्ज झाले बाद

कर्जत नगरपंचायतीत 13 अर्ज झाले बाद

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये आज दाखल झालेल्या अर्जांची छाननी झाली. यात 13 उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून आता 13 जागांसाठी 64 उमेदवारांचे 76 उमेदवारी अर्ज मंजूर झाले आहेत अशी माहिती प्रांत अधिकारी अजित थोरबोले व सहाय्यक निवडणूक अधिकारी गोविंद जाधव यांनी पत्रकारांना दिली.

- Advertisement -

कर्जत नगरपंचायत च्या 13 जागांसाठी 89 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज सकाळी नगरपंचायत कार्यालयामध्ये या सर्व अर्जाची छाननी करण्यात आली. यावेळी सर्व प्रमुख पक्षाचे उमेदवार उपस्थित होते. या छाननीमध्ये एकूण 13 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत . यात पक्षाचे एबी फॉर्म न जोडलेले 8 व शपथपत्रावर उमेदवाराची स्वाक्षरी नसल्याने असे पाच अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत.

हरकती मध्ये प्रभाग क्रमांक दोन जोगेश्वर वाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लंकाबाई देविदास खरात आणि प्रियंका केतन खरात यांच्या उमेदवारी अर्जावर मंगेश कचरे यांनी हरकत नोंदवली होती, या शिवाय प्रभाग क्रमांक आठ मधील उमेदवार भाऊसाहेब तोरडमल यांच्यावर घेत हरकत घेण्यात आली होती मात्र या सर्व हरकती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळून लावल्या आहेत.

न्यायालयात आव्हान

यामध्ये प्रभाग क्रमांक दोन मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार लंकाबाई देविदास खरात आणि प्रियांका केतन खरात यांच्या उमेदवारी अर्जावर मंगेश कचरे यांनी हरकत घेतली होती मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ती फेटाळून लावल्यामुळे याच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठ मध्ये याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे कचरे यांनी सांगीतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या