Friday, May 3, 2024
Homeनगरकर्जत पोलिसांची वाळू माफीयावर कारवाई

कर्जत पोलिसांची वाळू माफीयावर कारवाई

कर्जत |तालुका प्रतिनिधी| Karjat

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गोपीनीय माहिती मिळाली की, सिद्धटेक परिसरात अवैध वाळू वाहतूक होत आहे.

- Advertisement -

त्या अनुषंगाने यादव यांनी वाळूतस्करावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना दिले. त्या अनुषंगाने राशीन दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने सिद्धटेक फाटा येथे अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक येत असल्याचे समजले.

सोमनाथ दिवटे व स्टाफ हे सिद्धटेक फाटा येथे गेले असता त्यांना जलालपूरमार्गे एक ट्रक येताना दिसला. त्यामधून पाणी गळत असल्याने त्या ट्रक चालकास वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली. त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्याच्या ताब्यातील टाटा एस कंपनीची ट्रक व अडीच ब्रास वाळू असा एकूण 425000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक आरोपी दत्तात्रय शहाजी झुजरुक, वय 26, रा. नवनाथ नगर, आधोरेवाडी, ता. श्रीगोंदा याच्याविरुद्ध भादंवि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राशीन पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे व पोलीस स्टाफ तुळशीराम सातपुते, भाऊसाहेब काळे, गणेश ठोंबरे, सागर म्हेत्रे, गणेश भागडे, संपत शिंदे, मारुती काळे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या