Friday, May 3, 2024
Homeनगरकरजगावसह सात ते आठ गावांची पाणी योजना पुन्हा एकदा बंद

करजगावसह सात ते आठ गावांची पाणी योजना पुन्हा एकदा बंद

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

नेवासा तालुक्यातील शिरेगाव, खेडले परमानंदसह सात ते आठ गावांची पाणी योजना पुन्हा एकदा बंद झाल्यामुळे गावकर्‍यांना बाजूच्या गावांचा आधार घ्यावा लागत आहे.

- Advertisement -

सुत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार खेडले परमानंद, करजगाव, अमळनेर, निंभारी, नवीन चांदगाव, वाटापूर, गोमळवाडीसह बाजूच्या गावातील ही पाणी योजना पुन्हा एकदा बंद झाल्याचे पहावयास मिळत आहे.

ही योजना ब्राह्मणी ते राजळे वस्ती दरम्यान वारंवार तुटत असते. परंतु ठेकेदार मात्र तात्पुरती मलमपट्टी करून योजना सुरू करत असतात. परत एकदा आठ-दहा दिवस झाले की त्याच ठिकाणी ही जलवाहिनी फुटते.

योजना जर ट्रायल बेसवरच जर वारंवार खंडित होत असेल तर पुढील काळात ती कितपत टिकेल, असा प्रश्न पडला आहे. दि. 27 सप्टेंबरपासून ही योजना आजपर्यंत बंद आहे. ब्राह्मणी ते राजळे वस्ती दरम्यान तर चक्क मुख्य लाईनला अनधिकृत जलवाहिनी जोडण्याचा अजब प्रकार यानिमित्ताने उघडकीस आला आहे. या अनधिकृत पाईपलाईनद्वारे हे पाणी गावात जाते की आणखी कुठे हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

या अनधिकृत जोडलेल्या पाईपलाईनमुळे शेवटच्या काही गावांपर्यंत कधी कधी तर पाणी पोहचत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पाण्याचे कुठल्याही प्रकारचे शुध्दीकरण केले जात नाही अथवा त्यामध्ये जंतूनाशक औषधे टाकली जात नाहीत. त्यामुळे साथीच्या रोगाला जणू काही हे निमंत्रणच आहे.

सध्या करोनासारख्या आजाराचे थैमान सुरू असतानाच पाण्यात होणार्‍या बदलामुळे तर अजूनच सर्दी, खोकला, कावीळ या सारख्या आजारांना पुरक असे वातावरण या निमित्ताने होत आहे. ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत चार-चार किलोमीटरवर जावे लागत आहे. ही योजना चार दिवस सुरू तर पंधरा ते विस दिवस बंद राहत असल्याने नळधारक पाणीपट्टी भरण्यास धजावत नाही.

योजना अर्धवट आहे. जानेवारीपासून ठेकेदाराने खर्चापोटी आमच्याकडून दरमहा याप्रमाणे ऑगस्ट महिन्यापर्यंत 9200 रुपये घेतलेले आहेत. तरीदेखील या योजनेची योग्य प्रकारे देखभाल होत नसल्याने या पाणी योजनेचे पुढील भवितव्य धोकादायक असल्याचे करगावचे सरपंच यांनी सांगितले.

– अशोकराव टेमक, सरपंच करजगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या