Wednesday, March 26, 2025
Homeमनोरंजनकंगनाविरोधात एफआयआर दाखल करा

कंगनाविरोधात एफआयआर दाखल करा

नवी दिल्ली –

कृषी कायद्यांचा विरोध करणार्‍या शेतकर्‍यांना उद्देशून आक्षेपार्ह ट्वीट करणारी बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावतविरोधात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याचे आदेश

- Advertisement -

न्यायालयानं दिले आहेत. कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील एका न्यायालयानं शुक्रवारी पोलिसांना हे आदेश दिले. वकील रमेश नाईक यांनी प्रथम श्रेणी न्यायिक मॅजिस्ट्रेट यांच्या न्यालायात कंगना विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावरणी दरम्यान न्यायालयाने क्याथासंगरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांना कंगनाच्या विरोधा एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.

आपण दाखल केलेल्या याचिकेवरून न्यायालयानं पोलिसांना एफआयआर दाखल करण्यास तसंच याप्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले असल्याचे वकील रमेश नाईक यांनी सांगितलं. विधेयकांचं कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी राज्यसभेत कृषी विषयक दोन्ही विधेयके मंजूर करण्यात आली होती. काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला प्रचंड विरोध केला. तर, दिल्ली, हरयाणा या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांसह शेकडो शेतकरी या आंदोलनात रस्त्यांवर उतरल्याचे दिसून आलं होतं. त्यांच्या मंजुरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शेतकर्‍यांना किमान आधारभूत किंमतीबद्दल (एमएसपी) ग्वाही देखील दिली. यावर आता अभिनेत्री कंगना रणावत हिने मोदींच्या ट्वीटला रिट्वीट करत त्यांच्या भूमिकेचे समर्थन केलं आणि या विधेयकांना विरोध करणार्‍यांवर टीका केली होती.

काय म्हणाली होती कंगना?

कोणी झोपलं असेल तर त्याला जाग केलं जाऊ शकतं, ज्याला गैरसमज असेल त्याला समजावलं जाऊ शकतं. मात्र जे झोपण्याचं सोंग करत आहेत, न समजल्याचं नाटक करत आहेत. त्यांना तुमच्या समजावण्याने काय फरक पडणार? हे तेच दहशतवादी आहे. सीएएमुळे एकाही व्यक्तीचे नागरिकत्व गेले नाही मात्र त्यांनी रक्ताचे पाट वाहून टाकले. अशा शब्दांमध्ये ट्विट करत कंगना रणौतने या विधेयकांचा विरोध करणार्‍यांवर निशाणा साधला होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Snehal Jagtap : स्नेहल जगताप यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला अखेर जय महाराष्ट्र;...

0
मुंबई । Mumbai कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही. ही गळती थांबवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणतीही पावले उचलण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. आता...