जळगाव jalgaon
येथील निवृत्ती नगर (Nivritti Nagar) मधील केरळी महिला ट्रस्टचे (Kerala Mahila Trust) कार्तिक स्वामी मंदीर (Karthik Swamy Temple) दि. ७ रोजी कार्तिकी पौर्णिमेनिमीत्त (Kartik Poornima) दु. ४ वा १५ मि. पासून दर्शनासाठी (darshan) खुले करण्यात येणार आहे.
संपुर्ण केरळी पध्दतीने बांधलेले हे मंदीर गेल्या २५ वर्षापासून कार्तिकी पौर्णिमेनिमीत्त दर्शनासाठी खुले करण्यात येते.
या मंदिरात कार्तिकस्वामी व्यतिरीक्त नवग्रह व इतर देवतांची देखिल मंदीर असून ते वर्षभर दर्शनासाठी खुले असते. या मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी भाविक मोठया प्रमाणात येत असतात. ७ नोव्हें ४ वा १५ मि. कार्तिक पौर्णिमा सुरू होत असून ८ नोव्हें रोजी सायंकाळी ४ वा ३९ मि. पर्यत आहे.
७ नोव्हें ४.१५ मी ते ८ नोव्हें सकाळी ६.४५ मी पर्यंत पौर्णिमा काळात दर्शन घेता येणार असून मंदिर उघडे राहणार आहे. कृतिका नक्षत्र १० नोव्हें रोजी पहाटे ३ वा संपणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी दर्शन घ्यावे असे आवाहन केरळी महिला ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
दि. ८ रोजी सकाळी ६.४५ पासून ग्रहण सूरू होत असल्याने मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. याच दिवशी सायं ६ वा १८ मि. मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी बंद करण्यात येणार असून. ६ वा १९ मि.ग्रहण समाप्ती नंतर मंदिर दर्शनासाठी उघडण्यात येणार आहे.
पौर्णिमा उत्सव तयारी सूरू
कार्तिक पौर्णिमा उत्सवाच्या तयारीस प्रारंभ झाला असून मंदिर सजावट,भक्ताच्या दर्शनाची व्यवस्था आदिची जोमात तयारी सूरू आहे.