मुंबई | Mumbai
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा शर्मा-मुंडे यांनी त्यांच्याविरोधात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंडे यांनी शपथपत्रात शर्मा-मुंडे (Karuna Sharma-Munde) यांच्या मिळकतीबाबत उल्लेख केला नव्हता. त्यामुळे करुणा शर्मा यांनी ऑनलाइन (Online) तक्रार केली होती. या तक्रारीवर आज सुनावणी झाली. मात्र, सुनावणीपूर्वीच करुणा शर्मा-मुंडे यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर तोफ डागत त्यांच्याविरोधात माध्यमांशी बोलतांना मोठी भविष्यवाणी केली आहे.
यावेळी त्या म्हणाल्या की, “सगळ्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी बघितले की धनंजय मुंडेंनी २०० बूथ ताब्यात घेतले होते. तसेच निवडणुकीच्या शपथपत्रात माझे नावही टाकलेले नव्हते किंवा आमच्या केसचा संदर्भही दिला नाही. २०१४ पासून माझे नाव आणि माझ्या मुलाबाळांचे नाव टाकले नाही. यावर निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी कोणीच आक्षेप घेतला नाही. २०२४ मध्ये माझ्या मुलांचे नाव टाकले आणि माझे नाव गायब केले. या सर्वावर माझी लढाई सुरू आहे. आता त्यांचे वॉरंट निघेल, त्यांना सहा महिन्यांची शिक्षा होईल. आज स्वतः धनजय मुंडे यांना जावे लागणार आहे. जसे मी बोलले होते की, मंत्रीपद जाणार तर ते गेले. आता मी सांगते की, येत्या सहा महिन्यात त्यांची आमदारकी (MLA) जाईल, अशी मोठी भविष्यवाणी करुणा शर्मा- मुंडे यांनी केली आहे.
तसेच यावेळी त्यांनी माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या प्रकरणावरही भाष्य केले. त्या म्हणाल्या की, “लोकांच्या पैशांचा गैरवापर आणि लोकांचे पैसे जाणे, हे आहे. पण, भ्रष्ट लोकांना मंत्रालयात बसविले तर काय न्याय मिळणार? त्यामुले हे गेले पाहिजे. माझ्या पक्षाच्या (Party) माध्यमातून मी मुद्दा घेऊन याचिका दाखल करणार आहे, असे करुणा शर्मा-मुंडे यांनी म्हटले.