Friday, May 3, 2024
Homeजळगावकविवर्य ना.धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार

कविवर्य ना.धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

संयुक्त महाराष्ट्राचे झुंजार सेनापती, साहित्य सम्राट, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे (Acharya Prahlad Keshav Atre) यांच्या 124 व्या जयंतीदिनी दि.13 ऑगस्ट रोजी आचार्य अत्रे मानचिन्हाचा पुरस्कार (Award of Acharya Atre Medal) यावर्षी प्रख्यात कवी ना. धो. महानोर (Kavivarya Na.Dho. Mahanor) यांना प्रदान (provided) केला जाणार आहे. विशेष म्हणजे हा समारंभ खानदेशच्या मातीत जळगाव येथे 13 ऑगस्ट 2022 रोजी कस्तुरबा सभागृह, गांधी तीर्थ, जळगाव येथे सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे.

- Advertisement -

आचार्य अत्रे यांचे निधन 13 जून 1969 रोजी झाले. त्यानंतर 1971 पासून 2021 पर्यंत मसाहित्यसम्राट आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कारफ प्रदान करण्याचे कार्यक्रम मुंबईत आणि पुण्यात झाले. दिनांक 13 ऑगस्ट रोजी जळगावात होणारा हा पुरस्कार प्रदान समारंभ पहिल्याप्रथम खानदेशात होत आहे.

आचार्य अत्रे यांचे खानदेशच्या मातीशी घनिष्ठ संबंध होते. प्रख्यात कवी बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याचे महाराष्ट्रभर कौतुक करण्याचे काम पहिल्याप्रथम आचार्य अत्रे यांनी केले. दैनिक मराठातून बहिणाबाईंच्या कवितांवरचा गाजलेला अग्रलेख आजही महाराष्ट्रात चर्चेत असतो. श्री. सोपानदेव चौधरी आचार्य अत्रे यांचे खास मित्र होते. याखेरिज आचार्य अत्रे यांच्या द्वितीय कन्या श्रीमती मिनाताई देशपांडे यांचा विवाह धुळे येथील प्रा. सुधाकर देशपांडे यांच्याशी झाल्यामुळे अत्रे कुटुंबीयांचा खानदेशची जवळचा संबंध आहे.

या वर्षीचा पुरस्कार कवीश्रेष्ठ ना. धों. महानोर यांना आत्रेय तर्फे अ‍ॅड. राजेंद्र पै यांनी जाहीर केला. ते आचार्य अत्रे यांचे नातू आहेत. हा कार्यक्रम मुंबईत न करता जळगाव येथेच करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे.

आमदार शिरीष मधुकरराव चौधरी हे या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खानदेशमध्ये होणार्‍या आचार्य अत्रे जयंती समारंभाला उपस्थित राहावे, अशी विनंती अ‍ॅड. राजेंद्र पै यांनी केली आहे. या समारंभाला स्व. सुधाकर देशपांडे यांचे सुपुत्र अमेरिकेत असणारे अ‍ॅड. हर्षवर्धन देशपांडे हेसुद्धा उपस्थित राहून खानदेशच्या भूमिला अभिवादन करायला येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या