Sunday, April 27, 2025
Homeनाशिकमोहाडी आरोग्य केंद्राला 'कायाकल्प' पुरस्कार

मोहाडी आरोग्य केंद्राला ‘कायाकल्प’ पुरस्कार

जानोरी । वार्ताहर Janori

आरोग्य म्हटले स्वच्छत: व टापटीपपणा Clean and tidy हा भाग महत्त्वाचा असतो.शासकीय दवाखान्यात अस्वच्छतेचेच साम्राज्य असतं जनसामान्यांच्या मनातील या भावनेचा अस्त होत चाललला आहे. कारण शासकीय रूग्णालये अथवा आरोग्य केंद्र सुद्धा स्वच्छ व सुंदर असतात याच सुंदर व मुर्तीमंत उदाहरण म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, मोहाडी Mohadi Primary Health Center .या आरोग्य केंद्रास दुसर्‍यांदा प्रतिष्ठेचा समजला जाणारा कायाकल्प Kayakalp Award हा जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. छगन लोणे यांनी दिली.

- Advertisement -

केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य खात्याच्या वतीने देशभर रूग्णालय स्वच्छतेसाठी कायाकल्प हा पुरस्कार 2015 पासुन दिला जात आहे. हा पुरस्कार देताना जिल्हा स्तरीय अधिकार्‍यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली. यात आरोग्य केंद्रामधील स्वच्छतेविषयी विविध निकष जाहीर केले होते.

अंतर्गत रुग्ण तपासणी, रुग्णांच्या मुलाखती, रुग्णालय बाह्य स्वच्छता: , जैविक कचरा विल्हेवाट, कर्मचारी मुलाखतींसह मुल्यांकन अशा विविध स्तरावर पाहाणी करण्यात आली. या सर्व निकषांची पुर्तता करत मोहाडी आरोग्य केंद्राने जिल्ह्यातील सर्व स्पर्धक 108 आरोग्य केंद्रातुन प्रथम क्रमांक पटकावला.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व कर्मचार्‍यांनी प्रामाणिकपणे केलेल्या परिश्रमाचे सार्थक होवून मोहाडी आरोग्य केंद्र जिल्ह्यात आदर्श ठरले आहे. दुसर्‍यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. छगन लोणे यांचे अभिनंदन केले जात आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य समुदाय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञान अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, शिपाई, परीचर,वाहन चालक, गटप्रवर्तक, आशा वर्कर्स, सर्व कर्मचारी आम्ही सर्वांनी प्रामाणिक कर्तव्य पाडल्याने हे यश संपादन झाले आहे. कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी दिलेल्या सहकार्याने आम्हाला पाठबळ मिळते म्हणून मी कार्यक्षेत्रातील सर्वच मान्यवरांचे मी आभार मानतो .

डॉ. छगन लोणे, वैद्यकीय अधिकारी मोहाडी

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Indus Water Treaty : “सिंधू पाणी वाटप करार स्थगित केलाच नाही”;...

0
मुंबई | Mumbai  जम्मू-काश्मीरातील (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी नाव विचारून गोळीबार (Firing) करत दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू...