Saturday, April 26, 2025
Homeदेश विदेशकेदारनाथमध्ये ढगफुटी! अनेक यात्रेकरू अडकल्याची शक्यता, बचावकार्य सुरू

केदारनाथमध्ये ढगफुटी! अनेक यात्रेकरू अडकल्याची शक्यता, बचावकार्य सुरू

उत्तराखंड |वृत्तसंस्था|Uttarakhand

उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये आज बुधवार सायंकाळी उशिरा ढगफुटी झाली आहे. त्यामुळे मंदाकिनी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नाले तुडुंब भरले आहेत. ढगफुटीमुळे केदारनाथ धाममध्ये 150-200 यात्रेकरू अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुटकेसाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ढगफुटीमुळे केदारनाथ चालण्याच्या मार्गाचा भाग खराब झाला आहे. त्यामुळे यात्रेकरूंची ये-जा थांबली आहे. गेल्या अनेक तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडली आहे. मात्र, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्रशासन आणि एनडीआरएफची टीम मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहे. यात्रेकरूंना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : मनपा सेवक, एजंटाच्या घरावर ईडीचे छापे; बनावट जन्मदाखल्याप्रकरणी...

0
मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांना बनावट कागदात्रांच्या आधारे जन्मदाखले दिल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात (Case) आज ईडीच्या (ED) पथकाने शहरात महानगरपालिकेत (NMC) जन्ममृत्यू विभागात...