Sunday, June 30, 2024
Homeनगरबायपास रस्त्यावर टेलर-टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

बायपास रस्त्यावर टेलर-टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

रस्त्यावर उभ्या असलेल्या टेलरवर टेम्पो धडकून टेम्पो चालकाचा (नाव, पत्ता नाही) मृत्यू (Accident Death) झाल्याची घटना नेप्ती (ता. नगर) शिवारात मनमाडकडे (Manmad) जाणार्‍या बायपास रस्त्यावर घडली. या प्रकरणी पोलीस अंमलदार रवींद्र डावखर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेलर (एचआर 46 एफओ 771) चालकाविरूध्द (नाव, पत्ता नाही) नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालकाने बंद अवस्थेतील टेलर नेप्ती (Nepti) शिवारात केडगाव बायपास (Kedgav Bypass Road) ते मनमाडकडे जाणार्‍या रस्त्यावर नेप्ती कांदा मार्केटच्या पुढे उभा केला होता. निष्काळजीपणे रस्त्यावर उभ्या केलेल्या टेलरभोवती वाहतूक नियमांचे कोणतेही निशाण लावलेले नव्हते. त्या टेलरवर पाठीमागून आलेला टेम्पो (एमएच 45 एएफ 9190) धडकून टेम्पो (Tempo) चालकाचा मृत्यू (Death) झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रंजित मारग करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या