Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशPhoto : केरळमध्ये परतीच्या पावसाचा हाहाकार, नद्यांना पूर; अनेक घरं, इमारती पाण्याखाली

Photo : केरळमध्ये परतीच्या पावसाचा हाहाकार, नद्यांना पूर; अनेक घरं, इमारती पाण्याखाली

दिल्ली l Delhi

केरळला परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. अतिवृष्टीमुळे इथं अनेक भागांमध्ये पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली.

- Advertisement -

काही ठिकाणी पावसामुळं दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. केरळमध्ये एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.

केरळमध्ये पावसानं कहर माजवला असून, अनेक ठिकाणी घरं पाण्याखाली गेली आहेत. काही भागांमध्ये रस्तेही पाण्याखाली गेले आहेत.

मोठमोठाली घरंही पावसाच्या पाण्याखाली गेल्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र समोर आलं आहे.

आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण बेपत्ता असल्याची माहिती मिळते. इडुक्की आणि कोट्टायमसह पठानमथिट्टा या पर्वतीय भागांमध्ये पुराचा फटका बसला आहे.

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात रेड आणि ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता हवामान खात्याने या जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे.

पद्माट्टिट्टा, एर्नाकुलम, कोट्टायम, इडुक्की, त्रिशूर येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांसाठी हा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्याचबरोबर काही भागात ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. त्रिवेंद्रम, कोल्लम, अल्पुला, पलक्कड, मलप्पूरम, कोल्लीकोड आणि वायनाड या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या