Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशKerala Landslide News : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन; ११ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली...

Kerala Landslide News : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन; ११ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

नवी दिल्ली | New Delhi

देशभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता केरळच्या (Kearla) वायनाडमध्ये मंगळवारी पहाटे भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत ११ जणांचा मृत्यू (Death) झाला असून अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वायनाड जिल्ह्यातील (Wayanad District) मेप्पाडी भागात भूस्खलानाची ही घटना घडली असून या घटनेत तीन लहान मुलांसह ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

तसेच या घटनेनंतर एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच सध्या केरळमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने भूस्खलन झालेल्या ठिकाणी पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

दरम्यान, या दुर्घटनेत जखमी झालेल्या १० ते १५ जणांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तसेच घटनास्थळी आरोग्य विभागाचे पथकही दाखल झाले असून बचावकार्यासाठी हवाईदलाचे दोन हेलिकॉप्टर्सही दाखल झाल्याचे बोलले जात आहे. तसेच कोणत्याही मदतीसाठी कंट्रोल रुमही सुरु करण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...