Friday, November 15, 2024
Homeदेश विदेशKerala Wayanad Landslide : भूस्खलनातील मृतांची संख्या ९३ वर; १२८ जखमी, अनेकजण...

Kerala Wayanad Landslide : भूस्खलनातील मृतांची संख्या ९३ वर; १२८ जखमी, अनेकजण अडकल्याची भिती

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली | New Delhi

केरळच्या (Kerala) वायनाड जिल्ह्यातील (Wayanad District) मेप्पाडी भागात आज (मंगळवारी) पहाटेच्या सुमरास भूस्खलन झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर याठिकाणी मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन राबवविले जात असून दर तासाला मृतांचा आकडा वाढताना पाहायला मिळत आहे. सकाळी दुर्घटना घडल्यानंतर मृतांची संख्या ही ११ होती. त्यानंतर दुपारी हा आकडा ५६ आणि नंतर ६३ वर पोहचला होता. त्यानंतर आता या दुर्घटनेतील मृतांची संख्या आणखी वाढली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Kerala Landslide News : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन; ११ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत ९३ लोकांचा मृत्यू (People Death) झाला असून १२८ जण जखमी झाले आहेत. तर अद्यापही अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. तसेच भूस्खलनाच्या (Landslide) घटनेनंतर एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. पंरतु, मुसळधार पाऊस कोसळत असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.

तसेच या दुर्घटनेत वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी भागातील (Meppadi Area) चूरलमला, अट्टामला नूलपुझा, मुंडक्काई ही गावे जास्त प्रमाणावर प्रभावित झाले आहेत. तर ५ वर्षांपूर्वी देखील मुसळधार पावसामुळे (Rain) या चार गावांमध्ये भूस्खलन झाले होते. त्यावेळी या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता तर ५ जण बेपत्ता झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली असून अद्यापही या भूस्खलनामध्ये ४०० लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा : Kerala Landslide : वायनाड भूस्खलनातील मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत ‘इतके’ जण दगावले

दरम्यान, भूस्खलनाच्या या घटनेनंतर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan) यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी चर्चा केली असून केरळ सरकारला संकटाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी मदत केंद्र सरकार करेल, असे आश्वासन मोदींनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना दिले आहे.तसेच या भूस्खलनाच्या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना ५० हजारांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणाही केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या